करण जोहर दिग्दर्शित ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. यामध्ये अभिनेता रणवीर सिंहने ‘रॉकी रंधावा’ आणि अभिनेत्री आलिया भट्टने ‘राणी चॅटर्जी’ची भूमिका साकारली आहे. शूटिंगच्या पहिल्याच दिवशीच रणवीर चित्रीकरणासाठी प्रचंड उत्सुक होता. या अतिउत्साहात त्याने चुकीच्या सीनची तयारी केल्यामुळे काय घडले? याविषयी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अभिनेता करण जोहरने खुलासा केला आहे.

हेही वाचा : Video : “भयानक चालतेय…”, सारा अली खानचा रॅम्प वॉक पाहून नेटकऱ्यांनी केले ट्रोल, म्हणाले…

दिग्दर्शक करण जोहर ‘फिल्म कॅम्पेनियन’शी संवाद साधताना म्हणाला, “रणवीर वैयक्तिक आयुष्यातही रॉकीसारखा प्रचंड उत्साही आहे. रॉकीमध्ये असणाऱ्या प्रत्येक गोष्टींचा विचार करून त्याने या भूमिकेला पुरेपूर न्याय दिला. शूटिंगच्या पहिल्याच दिवशी रणवीरने चुकीच्या सीनसाठी तयारी केली होती. संपूर्ण सीन चुकीचा पाठ केला होता… रॉकी आणि राणी एकमेकांना ऑफिसमध्ये भेटतात या सीनसाठी तयारी करायची होती. मात्र, त्याला असे वाटले आम्ही वेगळा सीन शूट करणार आहोत.”

हेही वाचा : “लोक काय म्हणतील याची पर्वा…”, ईशा केसकरने लिव्ह इन रिलेशनशिपबाबत मांडले स्पष्ट मत; म्हणाली, “लग्न केले तर…”

करण पुढे म्हणाला, “आपण चुकीच्या सीनसाठी तयारी केली असल्याचे जेव्हा रणवीरला कळाले तेव्हा तो प्रचंड गोंधळला, हायपर झाला होता. तेव्हा मी त्याच्याकडे जाऊन विचारपूस केली. तो मला म्हणाला, इतिहासाच्या पेपरची तयारी केल्यावर अचानक भूगोलाचा पेपर आहे असे कळते…सध्या माझी अगदी तशी परिस्थिती झाली आहे.”

हेही वाचा : “मानसिक धक्क्यातून सावरण्याची…”, अभिनेत्री मयुरी देशमुखची ‘ती’ पोस्ट चर्चेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“रणवीरसाठी मी खास ब्रेक सांगितला आणि त्याला तयारी करण्यासाठी चार तास दिले. त्याने व्यवस्थित तयारी केली आणि तो सेटवर परत आला. जेव्हा त्याने तो सीन केला मी स्वत: थक्क झालो. यासाठी रॉकीच्या मित्राची भूमिका साकारणाऱ्या अभिनव शर्माचेही विशेष कौतुक मी करेन. त्यानेही सुंदर काम केले आहे.” असे करण जोहरने सांगितले. दरम्यान, ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटाने भारतात आतापर्यंत ५० कोटींहून अधिक कमाई केली आहे.