बॉलीवूड कलाकारांचे डीपफेक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. काही दिवसांपूर्वी आमिर खानचा एका राजकीय पक्षाचा प्रचार करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता, त्यानंतर आता रणवीर सिंग या डीपफेकचा बळी ठरला आहे. अभिनेत्याने त्याच्या व्हायरल झालेल्या डीपफेक व्हिडीओसंदर्भात पोलिसांत तक्रार दिली आहे.

‘इंडिया टुडे’ च्या वृत्तानुसार, डीपफेक व्हिडीओ व्हायरल झाल्यावर रणवीर सिंगने मुंबई पोलिसांच्या सायबर क्राइम सेलकडे तक्रार दाखल केली आहे. अभिनेत्याच्या एआयने बनवलेल्या डीपफेक व्हिडीओत तो राजकीय पक्षाचं समर्थन करताना दिसतोय. त्याचा हा व्हिडीओ वाराणसी दौऱ्यासाठी त्याने शूट केलेल्या व्हिडीओपासून तयार करण्यात आला होता. तक्रार दाखल करण्याआधी रणवीरने सोशल मीडियावर पोस्ट करत ‘डीपफेकपासून सावध राहा, मित्रांनो’ असं लिहिलं होतं. त्यानंतर आता अभिनेत्याने त्याच्या व्हायरल व्हिडीओसंदर्भात तक्रार दाखल केली आहे.

“आपल्या चित्रपटसृष्टीत प्रतिभावान…”, पाकिस्तान भेटीनंतर बॉलीवूड अभिनेत्रीने केलं तिथल्या कलाकारांचं कौतुक

रणवीर सिंगच्या प्रवक्त्याने तक्रारीची पुष्टी केली आहे. अभिनेत्याने पोलीस तक्रार दाखल केली आहे आणि सायबर क्राइम सेलकडून पुढील तपासासाठी एफआयआर दाखल करण्यात आला आहे, असं प्रवक्त्याने सांगितलं. “होय, आम्ही पोलीस तक्रार दाखल केली आहे आणि एआयच्या मदतीने तयार केलेला रणवीर सिंगचा डीपफेक व्हिडीओ शेअर करणाऱ्या हँडलविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे,” असं प्रवक्ता म्हणाला.

“बॉलीवूड सेलिब्रिटी अंत्यसंस्काराला जायचे पैसे घेतात,” प्रसिद्ध अभिनेत्याचा मोठा दावा; म्हणाला, “तेराव्याला जाण्याचे…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रणवीरआधी आमिर खानचाही डीपफेक व्हिडीओ व्हायरल झाला होता, ज्यात तो राजकीय पक्षाचा प्रचार करताना दिसत होता. हा व्हिडीओ बनावट असल्याचं स्पष्टीकरण अभिनेत्याने दिलं होतं व मुंबई पोलिसांच्या सायबर क्राइम सेलकडे तक्रारही केली होती. त्याचा हा व्हिडीओ ‘सत्यमेव जयते’ च्या एका एपिसोडमधून एडिट करून तयार करण्यात आला होता.