This Actor Rejected Salman Khan’s Movie : प्रत्येक कलाकाराला वाटतं की ते साकारत असलेली भूमिका कथानकातील महत्त्वाचा भाग असावी. त्यामुळे अनेकदा काही कलाकार मनासारखी भूमिका नसल्यास चित्रपटांना नाकार दिल्याचं सांगतात. असंच काही एका लोकप्रिय अभिनेत्याने केलं होतं. त्याने सलमान खानच्या चित्रपटात काम करण्यास नकार दिलेला.
आदित्य चोप्राची निर्मिती असलेल्या ‘एक था टायगर’ चित्रपटात सलमान खान व कतरिना कैफने मुख्य भूमिका साकारलेली. त्यांच्या व्यतिरिक्त इतरही काही कलाकारंनी यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेली. दिवंगत अभिनेते गिरीश कर्नाड यांनीही या चित्रपटात काम केलेलं. त्यांनी सलमान खानच्या मार्गदर्शकांची भूमिका साकारलेली. त्यांच्याबरोबर लोकप्रिय अभिनेता रणवीर शोरीने या चित्रपाटत गोपी ही भूमिका साकारलेली. त्याच्या कामाचं कौतुकही झालं होतं. परंतु, असं असातनाही अभिनेत्याने या चित्रपटाच्या सिक्वलमध्ये काम करण्यास नकार दिलेला.
रणवीर शोरीने ‘या’ कारणामुळे नाकारलेला सलमान खानचा चित्रपट
‘डिजीटर कॉमेंट्री’ला दिलेल्या मुलाखतीत त्याने याबद्दल सांगितलं आहे. तो म्हणाला, “‘एक था टायगर’नंतर मला टायगर २ म्हणजेच ‘टायगर जिंदा हैं’साठी विचारणा झालेली. पण त्यातील भूमिका ‘एक था टायगर’मधील भूमिकेपेक्षा छोटी होता. जेव्हा मला स्क्रीप्ट मिळाली तेव्हा मला याबद्दल समजलं की मी जे आधी केलं त्याहीपेक्षा आताची भूमिका छोटी आहे त्यानुसार मला मिळणारं मानधनही कमी होतं”.
रणवीर शोरी पुढे म्हणाला, “जर या चित्रपटात माझ्या भूमिकेला कमी महत्त्व देण्यात येणार असेल तर निदान माझं मानधन आणि स्क्रीन प्रेजेन्स तरी वाढवायला हवा. एवढंच माझं मत होतं. पण त्यांनी सांगितलं की आम्ही तसं नाही करू शकत मग मी चित्रपटाला नकार दिला.”
२०२३ साली यशराज प्रॉडक्शनने ‘टायगर ३’साठी रणवीर शोरीला पुन्हा विचारलेलं. याबद्दल तो म्हणाला, “‘टागयर ३’ बनण्याआधी गिरिष कर्नड यांचं निधन झालं. त्यामुळे त्यांच्यानंतर टायगरच्या टीममधील मी एकमेव व्यक्ती उरलो होतो. त्यांनी मला विचारलं पण यावेळीसुद्धा तीच समस्या होती. मी त्यांना विचारलं की तुम्ही मला माझी भूमिका संपवण्यासाठी परतायला सांगत आहात? ते म्हणाले हो. म्हणून मी रागत होकार दिला.”
दरम्यन, रणवीर शोरी ‘बिग बॉस’ ओटीटीच्या ३ पर्वात सहभागी झाला होता. त्यावेळी तो बराच चर्चेत आला होता. या व्यतिरिक्त त्याने आजवर अनेक चित्रपटात काम करत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे.