Raveena Tandon Daughter Rasha Thadani Dance Video : रवीना टंडनने बॉलीवूडच्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे. तिचा ‘मोहरा’ सिनेमा ९० च्या दशकात प्रदर्शित झाला होता. यामधील ‘टिप टिप बरसा पानी’ हे गाणं सर्वत्र सुपरहिट झालं होतं. या गाण्यातील रवीना टंडन आणि अक्षय कुमारच्या केमिस्ट्रीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. आता रवीनाची लेक राशा थडानीने याच लोकप्रिय गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे.

राशा थडानीने ‘झी सिन अवॉर्ड्स’मध्ये ‘टिप टिप बरसा पानी’ गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे. याचे व्हिडीओ अनेक पापाराझी इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आले आहेत. राशाच्या कमाल एक्स्प्रेशन्स आणि जबरदस्त डान्सचं सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

रवीना टंडनच्या २० वर्षांच्या लेकीने म्हणजेच राशा थडानीने ‘आझाद’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटात राशाने ‘उई अम्मा’ गाण्यावर जबरदस्त एक्स्प्रेशन्स देत डान्स केला होता. राशाच्या पहिल्या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर फारसं यश मिळालं नसलं, तरीही यामधील ‘उई अम्मा’ हे गाणं सर्वत्र व्हायरल झालं होतं.

आता राशा थडानी पुरस्कार सोहळ्यात आई रवीना टंडनच्या आयकॉनिक गाण्यावर थिरकली आहे. राशा इतर नेपोकिड्सपेक्षा खूपच चांगला अभिनय करते, तिचं नृत्यकौशल्य सुद्धा खूप सुंदर आहे अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर दिल्या आहेत.

“बेस्ट नेपो किड…किती सुंदर परफॉर्म केल आहे”, “राशा सेम तिच्या आईसारखी आहे”, “ही मुलगी सेम तिच्या आईची कॉपी आहे, राशा नेक्स्ट सुपरस्टार होणार”, “राशा करिअरमध्ये खूप पुढे जाणार”, “कतरिना आणि राशाने एकत्र परफॉर्म केलं पाहिजे…इतका सुंदर डान्स करतेय ही मुलगी”, “ओह माय गॉड राशा…जस्ट वॉव” अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर केल्या आहेत.

View this post on Instagram

A post shared by Manav Manglani (@manav.manglani)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, राशा सध्या फक्त २० वर्षांची असून तिने ‘आजाद’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं आहे. १७ जानेवारी २०२५ रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. राशाबरोबर अमन देवगण या सिनेमात झळकला आहे.