यावर्षी दिग्दर्शक एसएस राजमौली यांच्या ‘आरआरआर’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अद्भुत असा इतिहास रचला. लोकांनी हा चित्रपट चांगलाच डोक्यावर घेतला. याची ऑस्करवारी हुकली असली तरी बाहेरील देशातही ‘आरआरआर’ला चांगलीच लोकप्रियता मिळाली. जपानमध्ये तर या चित्रपटाने जबरदस्त कमाई केली. काही लोकांनी या चित्रपटावर टीकादेखील केली.

नुकतंच ज्येष्ठ अभिनेत्री रत्ना पाठक शहा यांनी या चित्रपटाबद्दल केलेलं विधान चांगलंच व्हायरल होत आहे. राम चरण आणि ज्युनिअर एनटीआरचा हा चित्रपट अलुरी सीताराम राजू आणि कोमराम भीम या क्रांतिकारकांच्या आयुष्यावर बेतलेला आहे. रत्ना पाठक यांनी या चित्रपटावर केलेल्या टिप्पणीमुळे सोशल मीडियावर त्यांना चांगलंच ट्रोल केलं जात आहे.

आणखी वाचा : हजारो फुटांवरून उडी मारताना टॉम क्रूझने पाठवला खास व्हिडिओ मेसेज; चाहते म्हणाले “हे अविश्वसनीय…”

एका पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यादरम्यान फ्री प्रेस जर्नलच्या वार्ताहाराशी संवाद साधताना रत्ना पाठक यांनी या चित्रपटाबद्दल त्यांचं मत व्यक्त केलं. त्या म्हणाल्या, “आरआरआर सारखे चित्रपट आजकाल लोकप्रिय होतात. पण हा चित्रपट फारच बुरसटलेल्या आणि प्रतिगामी विचारांचा आहे. सध्याच्या काळात आपण पुढे पाहायला हवं. जोवर दिग्दर्शक स्वतःच्या कलाकृतीकडे समीक्षकाच्या नजरेतून पाहत नाही तोवर ‘आरआरआर’सारखेच चित्रपट आपल्याला बघावे लागतील.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रत्ना पाठक लवकरच गुजराती चित्रपटात पदार्पण करणार आहेत. त्यांचा ‘कच्छ एक्सप्रेस’ ६ जानेवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. याचं दिग्दर्शन विरल शाह यांनी केलं आहे. यावर्षी रत्ना यांनी जॉन अब्राहमच्या ‘अटॅक’ आणि रणवीर सिंगच्या ‘जयेशभाई जोरदार’मध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती.