नुकताच भारत सरकारकडून अभिनेत्री रवीना टंडनला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. तेव्हापासून रवीना चांगलीच चर्चेत आहे. राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा सन्मान रवीनाला देण्यात आला. या सोहळ्याला रवीनाने मुलगी राशा आणि मुलगा रणबीर थडानी यांच्यासह हजेरी लावली होती. या सोहळ्यानंतर रवीनाने तिच्या मुलांसह मुंबई गाठली.

मुंबई विमानतळावर रवीना टंडन दिसताच चाहत्यांनी तिच्याभोवती सेल्फीसाठी घोळका केला. पद्मश्री पुरस्कार हातात घेऊनच रवीना विमानतळाबाहेर पडली. या दरम्यान बऱ्याच लोकांनी रवीनाला अभिनंदन करण्यासाठी आणि तिच्याबरोबर एक फोटो काढण्यासाठी तिच्याभोवती गराडा केला. यात रवीनाची मुलगी राशाला धक्काबुक्की झाल्याचं समोर आलं आहे.

आणखी वाचा : “अश्लीलता, नग्नता, शिवीगाळ हे…” ओटीटी सेन्सॉरशीपबद्दल सलमान खानचं मोठं वक्तव्य

रवीना विमानतळाबाहेर पडताच चाहत्यांनी तिला खूप शुभेच्छा दिल्या. तिथे उपस्थित असलेल्या पपाराजींनीसुद्धा तिला शुभेच्छा दिल्या. बऱ्याच लोकांनी रवीनासह सेल्फी काढला, दरम्यान आपल्या गाडीजवळ येत असताना सेल्फी घेणाऱ्या एका व्यक्तीचा रवीनाची मुलगी राशाला धक्का लागला. यामुळे रवीना चांगलीच नाराज झाली. तिने स्पष्ट शब्दांत “कृपया मुलांना धक्का देऊ नका” अशी नम्र शब्दांत विनंती करत चाहत्यांना फोटो काढू दिले. या धक्काबुक्कीमुळे रवीना नाराज झाल्याचं व्हिडिओमध्ये बघायला मिळत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आपल्या आईप्रमाणेच मुलगी राशा थडानीही सोशल मीडियाच्या माध्यमातून चर्चेत असते. रवीनाने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. तिच्या चित्रपटक्षेत्रातील योगदानासाठी तिला पद्मश्री देण्यात आला आहे. चित्रपटाबरोबरच रवीनाने ओटीटी या मध्यमातूनही अभिनयाची चुणूक दाखवली आहे. ‘अरण्यक’ या वेबसीरिजमधील रवीनाच्या कामाचं प्रचंड कौतुक झालं.