Rekha’s Relationship With Pakistani Cricketer : रेखा बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. ९०च्या काळात त्यांनी त्यांच्या सौंदर्याने व सहज सुंदर अभिनयाने अनेकांच्या मनात घर केलं. आजही रेखा यांची क्रेझ कायम आहे. रेखा व्यावसायिक आयुष्याव्यतिरिक्त खासगी आयुष्यामुळेही चर्चेत असायच्या.

९०च्या काळात रेखा यांचं नाव पाकिस्तानमधील लोकप्रिय क्रिकेटरबरोबर जोडलं गेलं होतं. त्याकाळी दोघे डेट करायचे अशा चर्चा होत्या. माध्यमांच्या माहितीनुसार रेखा व पाकिस्तानचे माजी क्रिकेटर व राजकीय नेते इमरान खान डेट करायचे असं म्हटलं जायचं. परंतु, खरंच त्यांनी एकमेकांना डेट केलं का किंवा ते खरोखर लग्न करणार होते का?

‘न्यूज १८’च्या वृत्तानुसार १९८० च्या दरम्यान, रेखा आणि इमरान खान यांचं अनेकदा नाव जोडलं जायचं. अनेकदा ते दोघे काही कार्यक्रमांदरम्यान एकत्र पाहायला मिळायचे, त्यामुळे दोघांच्या रिलेशनशिपबद्दलच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. १९८५ मध्ये इमरान खान काही आठवडे मुंबईत रेखाबरोबर राहिल्याच्याही चर्चा होत्या.

उल्लेख केलेल्या माध्यमाच्या वृत्तानुसार रेखा व इमरान यांना एकत्र पाहिलेल्या लोकांना ते दोघे खरंच एकमेकांच्या प्रेमात असल्याचं जाणवायचं. रेखाच्या आई पुष्पावल्ली यांनादेखील इमरान आवडायचे आणि रेखा व इमरान यांनी लग्न करावं अशी त्यांचीसुद्धा इच्छा होती. त्यांनी रेखासाठी इमरान खान योग्य निवड ठरतील का याबद्दल जाणून घेण्यासाठी ज्योतिषाची भेट घेतल्याचं म्हटलं जातं.

रेखा व इमरान यांनी एकत्र डान्सही केला होता. १९८९ दरम्यान, रेखा यांनी लाहोर येथे इमरान खान यांच्याबरोबर एका कॉन्सर्टमध्ये हजेरी लावली होती. तेव्हा त्या कार्यक्रमात रेखा इमरान खान, विनोद खन्ना आणि क्रिकेटर जावेद यांच्याबरोबर नृत्य करताना दिसल्या होत्या.

रेखा किंवा इमरान यांच्यातील कोणीही रिलेशनशिपबद्दल कबुली दिली नव्हती, त्यामुळे त्याबद्दल आजवर कोणालाही माहिती नाहीये की त्या दोघांमध्ये काय झालं, ते वेगळे का झाले.

दरम्यान, रेखा यांनी ९०च्या काळात अनेक गाजलेल्या चित्रपटांत वैविध्यपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांची मनं जिंकली. त्यांनी त्याकाळी बॉलीवूडमधील दिग्गज कलाकारांबरोबर काम केलं होतं.