बॉलिवूड सेलिब्रिटीजचे फोटोज सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होतात. याबरोबरच त्यांच्या आयुष्यातील बऱ्याच गोष्टींबद्दल लोकांना उत्सुकता असते,. याबरोबरच त्यांच्या बालपणीच्या फोटोजबद्दल चाहत्यांमध्ये बरीच उत्सुकता आढळून येते. अशाच एका बॉलिवूड अभिनेत्रीचा लहानपणीचा एक फोटो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

या अभिनेत्रीबद्दल सांगायचं झालं तर ही एका मोठ्या फिल्मी कुटुंबातील आघाडीची अभिनेत्री आहे आणि हिने बऱ्याच मोठमोठ्या कलाकारांबरोबर काम केलं आहे. या अभिनेत्रीने सलमान खान आणि गोविंदा या दोन सुपरस्टार्सबरोबर जबरदस्त सुपरहीट चित्रपट दिले आहेत.

आणखी वाचा : विश्लेषण : वजन वाढल्याने पूर्व मिस युनिव्हर्स हरनाझ संधू पुन्हा झाली ट्रोल; जाणून घ्या तिला झालेल्या ‘या’ आजाराविषयी

या फोटोतील लहान मुलगी ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री करिश्मा कपूर आहे. काही दिवसांपूर्वी करिश्माने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर हा फोटो पोस्ट केला होता. करिश्मा या फोटोत फार गोड आणि लबाड दिसत आहे. सोशल मीडियावर तिचा हा फोटो सध्या चर्चेत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

करिश्माने बॉलिवूडच्या सगळ्या बड्याबड्या कलाकारांनाबरोबर काम केलं आहे. गोविंदा आणि सलमान खानबरोबर तिची जोडी सुपरहीट ठरली. सलमान आणि करिश्माने बऱ्याच चित्रपटात एकत्र काम केलं. ‘अंदाज अपना अपना’, ‘जुडवा’, ‘बिवी नंबर १’, ‘हम साथ साथ है’, अशा सुपरहीट चित्रपटात यांची जोडी प्रेक्षकांना भलतीच पसंत पडली. लवकरच करिश्मा ‘ब्राऊन’ या वेबसीरिजमधून अभिनयात पुनरागमन करणार आहे.