Riteish Deshmukh Praises Wife Genelia : बॉलीवूड अभिनेता आमिर खान याचा ‘सितारे जमीन पर’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. आज २० जूनपासून हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात आमिरसह अभिनेत्री जिनिलीया देशमुखही महत्त्वाच्या भूमिकेत आहे. अनेक दिवसांपासून आर. एस. प्रसन्ना दिग्दर्शित ‘सितारे जमीन पर’ चित्रपटाची चर्चा सुरू आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरलादेखील प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

नुकतंच या चित्रपटाचं स्क्रीनिंग पार पडलं. या स्क्रीनिंगला शाहरुख आणि सलमानसह अनेक बॉलीवूड कलाकारांनी हजेरी लावली होती. सचिन तेंडुलकर यांच्यासह अनेक कलाकारांनी या चित्रपटाचं भरभरून कौतुक केलं आहे. अशातच जिनिलीयाचा पती व अभिनेता रितेश देशमुखने नुकताच ‘सितारे जमीन पर’ हा चित्रपट पाहिला. चित्रपट पाहिल्यानंतर त्यानं चित्रपटाचं आणि पत्नी जिनिलीयाचं कौतुक केलं आहे.

Faridoon Shahryar यांना दिलेल्या मुलाखतीत, रितेश पत्नी जिनिलीयाचं कौतुक करीत म्हणाला, “मी सिनेमा पाहिला आहे आणि खूपच कमाल सिनेमा आहे. मला या चित्रपटाचा अभिमान आहे. आमिर आणि जिनिलीयानं ज्या पद्धतीने अभिनय केला आहे, त्याचाही मला अभिमान आहे. तसेच या विषयावर असा चित्रपट बनवण्यासाठी खूप धाडस लागतं आणि याबद्दलही मला आमिर-जिनिलीया यांचा अभिमान आहे.”

रितेश-जिनिलीया इन्स्टाग्राम पोस्ट

रितेश-जिनिलीया या दोघांचं जोडपं मराठीसह हिंदी सिने क्षेत्रातील एक आदर्श आहे. दोघेही सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. दोघे एकमेकांबरोबरचे अनेक फोटो आणि मजेशीर व्हिडीओ शेअर करत असतात. तसेच एकमेकांच्या कामाचं कौतुक करत असतात. ‘रेड २’, ‘हाऊसफुल ५’च्या यशाबद्दल जिनिलीयानं रितेशसाठी कौतुकास्पद पोस्ट शेअर केल्या होत्या. त्यानंतर आता रितेशनंही जिनिलीयाच्या कामाचं कौतुक केलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, आमिर खानचा ‘सितारे जमीन पर’ हा चित्रपट एका स्पॅनिश चित्रपटाचा रिमेक आहे. या चित्रपटात आमिर आणि जिनिलीया यांच्यासह आरोश दत्ता, गोपी कृष्ण वर्मा, संवित देसाई, वेदांत शर्मा, आयुष भन्साळी, आशीष पेंडसे, ऋषी शहानी, ऋषभ जैन, नमन मिश्रा व सिमरन मंगेशकर या नवोदित कलाकारांचासुद्धा विशेष सहभाग आहे. आमिर आणि अपर्णा पुरोहित यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.