Riteish Deshmukh shares photo with wife Genelia Deshmukh: चित्रपटसृष्टीत काम करणारी काही सेलिब्रिटी जोडपी लोकप्रिय आहेत, ज्यामध्ये विकी कौशल-कतरिना कैफ, रणबीर कपूर व आलिया भट्ट, सिद्धार्थ मल्होत्रा व कियारा अडवाणी, दीपिका पादुकोण व रणवीर सिंह अशा काही जोडप्यांचा समावेश होतो. त्यामध्ये मराठमोळा रितेश देशमुख व त्याची पत्नी जिनिलीया देशमुख या जोडीचाही समावेश आहे.

रितेश देशमुख व जिनिलीया देशमुख चित्रपटातून, त्यांच्या विविध धाटणीच्या भूमिकांतून जितके प्रेक्षकांचे मन जिंकतात, तितकेच ते त्यांच्या स्वभावानेदेखील प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात.

जेव्हा जेव्हा ते सार्वजनिक ठिकाणी दिसतात, त्यावेळी त्यांच्यातील केमिस्ट्रीने, एकमेकांप्रति असलेल्या आदर, काळजी व प्रेमाने ते सर्वांची मने जिंकतात. पापाराझींकडून शूटिंग केले गेलेले त्यांचे व्हिडीओदेखील व्हायरल होताना दिसतात. अनेक चाहते त्यांना दादा-वहिनी म्हणूनही संबोधतात. चित्रपटच नव्हे, तर सोशल मीडियावर त्यांनी शेअर केलेल्या व्हिडीओंनादेखील प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळताना दिसतो.

आता रितेश देशमुखने पत्नी जिनिलीयासह एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो आणि त्याला दिली गेलेली कॅप्शन लक्ष वेधून घेत आहे. रितेश व जिनिलीया पायऱ्यांवर उभे आहेत आणि ते दोघे एकमेकांकडे पाहत आहेत. रितेश व जिनिलीया दोघेही हसताना दिसत आहेत. हा फोटो शेअर करताना रितेशने लिहिले, “काही जण याला केमिस्ट्री म्हणतात; पण आम्ही याला हास्य म्हणतो.”

रितेशने शेअर केलेल्या या फोटोला अनेक चाहत्यांनी लाइक केले आहे. अभिनेत्री भाग्यश्री, नर्गिस फाखरी यांनीदेखील कमेंट्स करीत दोघांचे कौतुक केले आहे. चाहत्यांनीदेखील कमेंट्स करीत रितेश व जिनिलीयावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

नेटकरी काय म्हणाले?

भाग्यश्रीने लिहिले, “तुम्ही दोघेही खूप छान आहात”, तर नर्गिस फाखरीने लिहिले,”द बेस्ट”. अभिनेत्रींनी आपापल् कमेंट्समधून या या जोडप्याचे कौतुक केले आहे. चाहत्यांनी लिहिले, “बॉलीवूड इंडस्ट्रीतील सर्वोत्तम जोडपे”, “सर्वांत बेस्ट जोडपे”, “लय भारी दादा”, अशा अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत. तर, अनेकांनी हार्ट इमोजी शेअर केल्या आहेत.

रितेश जिनिलीया यांनी वेड, मुझे तेरी कसम, मिस्टर मम्मी अशा काही चित्रपटांत एकत्र काम केले आहे. रितेश काही दिवसांपूर्वीच रेड २, हाऊसफुल ५ या चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. तर, जिनिलीया देशमुख सितारे जमीन पर या चित्रपटात आमिर खानबरोबर प्रमुख भूमिकेत दिसली होती. आता हे कलाकार आगामी काळात कोणत्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.