Riteish Deshmukh Message For Anant Ambani and Radhika Merchant : अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या विवाहसोहळ्याची गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा चालू आहे. या समारंभाला बॉलीवूड कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळाली होती. या लग्नसोहळ्याला अभिनेता रितेश देशमुख व त्याची पत्नी अभिनेत्री जिनिलीया देशमुख यांनी जोड्याने उपस्थिती लावली होती. त्यांच्या मराठमोळ्या लूकची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. अशातच रितेश देशमुखने हा लग्नसोहळा पार पडल्यावर अनंत व राधिकासाठी एक खास पोस्ट लिहिली आहे.

रितेश देशमुख लिहितो, “प्रिय राधिका व अनंत…. खऱ्या प्रेमाची व्याख्या काय आहे हे तुम्हा दोघांकडे पाहून लक्षात येतं. तुमच्या डोळ्यात एकमेकांबद्दल असलेलं प्रेम, आपुलकी, काळजी सगळं काही दिसून येतं. तुम्ही दोघंही आयुष्यात असेच आनंदी राहा. लग्न केवळ दोन व्यक्तींचं नसून दोन कुटुंबांमध्ये होत असतं. आम्हाला तुमच्या आनंदात सहभागी करून घेतल्याबद्दल अंबानी व मर्चंट कुटुंबीयांचे आम्ही आभार मानतो.”

हेही वाचा : रणबीर कपूर, करण जोहरशी अजूनही संपर्कात; पाकिस्तानी अभिनेता फवाद खानची माहिती, म्हणाला, “त्यांच्याबद्दल खूप…”

अभिनेता पुढे लिहितो, “मुकेशजी व नीताजी यांनी एवढ्या मोठ्या समारंभात सर्वांकडे वैयक्तिकरित्या लक्ष दिलं, विचारपूस केली ही खूप मोठी गोष्ट आहे. अनंत व राधिका तुमच्या पालकांनी हा सोहळा केवळ संस्मरणीय न बनवता हृदयस्पर्शी बनवला… येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याची कुटुंबाप्रमाणे विचारपूस केली. या आदरातिथ्याबद्दल खूप खूप धन्यवाद.”

रितेश देशमुखने अनंत-राधिकाला दिल्या शुभेच्छा ( Riteish Deshmukh )

“अनंत व राधिका तुम्हा दोघांसाठी एक खास मेसेज आहे तो म्हणजे तुमचं प्रेम सदैव असंच वाढत राहूदे. आता आयुष्यातील पुढचा प्रवास एकत्र असाच आनंदाने करा…आम्ही तुमच्या आनंदात नेहमीच सहभागी होणार आहोत…जिनिलीया व माझ्याकडून तुम्हा दोघांना खूप प्रेम” अशी पोस्ट रितेश देखमुखने अनंत अंबानीसाठी शेअर करत या जोडप्याला वैवाहिक आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा : “१० व्या वर्षी मासिक पाळी आल्याने शारीरिकदृष्ट्या माझे बालपण…”, रेणुका शहाणेंनी सांगितला अनुभव; म्हणाल्या, “माझ्या वर्गात…”

View this post on Instagram

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
anant ambani
अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्यासाठी रितेश देशमुखने शेअर केली खास पोस्ट

दरम्यान, अंबानींच्या लग्नात जिनिलीयाने ऑफ व्हाइट रंगाची नऊवारी साडी, त्यावर गोल्डन रंगाची शाल, कपाळी चंद्रकोर, नाकात नख, हातात चुडा असा मराठमोळा पारंपरिक लूक केला होता. तर, रितेशने देखील ऑफ व्हाइट रंगाची शेरवानी घातली होती. या दोघांच्या लूकच सर्वांकडून कौतुक करण्यात आलं.