Rocky aur Rani ki Prem Kahaani box office collection day 3 : करण जोहर दिग्दर्शित ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे. २८ जुलै रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्या दिवसाच्या तुलनेत दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी दमदार कमाई केली आहे. या चित्रपटातील आलिया भट्ट आणि रणवीर सिंहची जोडी आणि त्यांची केमेस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली आहे. वीकेंडला चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी थिएटरमध्ये गर्दी केल्याचं पाहायला मिळालं.

स्वानंदी व आशिषचे लग्न कधी, कुठे होणार? उदय टिकेकरांनी केला खुलासा; म्हणाले, “त्यांचे लग्न…”

‘रॉकी आणि रानी की प्रेम कहानी’ने रविवारी किती कमाई केली ते जाणून घेऊया. त्याच बरोबर तीन दिवसांची आकडेवारी आणि एकूण जमवलेला गल्ला, यावरही एक नजर टाकुयात. चित्रपटाने पहिल्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी ११.१० कोटी रुपयांची कमाई केली होती. त्यानंतर शनिवारी दुसऱ्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत ४४.५९ टक्के वाढ झाली आणि १६.५ कोटींचा गल्ला जमवला. त्यानंतर आता तिसऱ्या दिवसाची आकडेवारीही समोर आली आहे.

“स्वानंदी-आशिषचं लग्न ग्रँड होणार नाही, कारण…”, उदय टिकेकरांनी सांगितला लेकीच्या लग्नाचा प्लॅन; म्हणाले, “मला अनेकजण शिव्या…”

‘सॅकनिल्‍क’च्‍या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ ने रिलीजच्‍या तिसर्‍या दिवशी म्हणजेच रविवारी १८ कोटी रुपयांचे ग्रँड कलेक्‍शन केले आहे. त्यानंतर चित्रपटाची तीन दिवसांची एकूण कमाई आता ४५.१५ कोटींवर गेली आहे. एकूणच चित्रपटाला प्रेक्षकांचा मिळणारा प्रतिसाद बघता कमाईचा आकडा या आठवड्यात आणखी वाढेल, असा अंदाज आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’मध्ये या चित्रपटात आलियाने बंगाली मुलीची तर रणवीरने पंजाबी मुलाची भूमिका साकारली आहे. तसेच धर्मेंद्र, जया बच्चन, शबाना आझमी, क्षिती जोग यांच्यासह अनेक कलाकार या चित्रपटात आहेत.