‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपट प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतताना दिसत आहे. २८ जुलै रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. या चित्रपटाला समीक्षक व प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. दिग्दर्शक करण जोहरचा कमबॅक चित्रपट असलेल्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’मध्ये रणवीर सिंह, आलिया भट्ट, धर्मेंद्र, जया बच्चन, शबाना आझमी यांच्यासह अनेक कलाकार आहेत.

हेही वाचा- “माझे वडील काहीपण…” शबाना आझमी व वडील धर्मेंद्र यांच्या किसिंग सीनवर सनी देओलची प्रतिक्रिया, म्हणाला…

‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपटाने पहिल्या दिवशी ११.५० कोटी रुपयांची कमाई केली होती. तर पहिल्या आठवड्यात या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात ७३.३३ कोटींचा व्यवसाय केला. दुसऱ्या आठवडयाच्या शेवटी या चित्रपटाच्या कमाईत चांगलीच वाढ झाली आहे. वीकेंडला चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी चित्रपटगृहांमध्ये गर्दी केल्याचे पहायला मिळाले त्यामुळे चित्रपटाच्या कमाईत चांगलीच वाढ झाली आहे. प्रदर्शनाच्या १०व्या दिवशी या चित्रपटाने १३.५० कोटींचा व्यवसाय केला असून या चित्रपटाने कमाईत १०० कोटींचा टप्पा पार केला आहे. या चित्रपटाची एकूण कमाई १०५ कोटी रुपयांवर पोहचली आहे.

हेही वाचा- “तू संबंध ठेवलेस…”, ‘रॉकी और रानी’ फेम अभिनेत्रीने सांगितला बॉडी शेमिंगचा धक्कादायक अनुभव; म्हणाली, “लठ्ठ मुलींना…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, या चित्रपटाच्या माध्यमातून करण जोहरने सात वर्षांनी दिग्दर्शनात पुनरागमन केलं आहे. फॅमिली ड्रामा असलेल्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’मध्ये ‘गली बॉय’नंतर पुन्हा एकदा आलिया व रणवीर मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटात आलियाने बंगाली मुलीची तर रणवीरने पंजाबी मुलाची भूमिका साकारली आहे.