ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेता प्रभासने प्रभू श्रीरामाची, तर अभिनेत्री क्रिती सेनॉनने सीतेची भूमिका साकारली आहे. प्रभास-क्रितीचे चाहते सध्या ‘आदिपुरुष’ चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत असून, चित्रपटाच्या ट्रेलरसह गाण्यांना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे.

हेही वाचा : ‘द आर्चीज’: एकाच चित्रपटातून पदार्पण करणार ३ स्टारकिड्स; नेटकरी म्हणाले “पुन्हा नेपोटीजम…”

‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या वाढत्या लोकप्रियतेच्या पार्श्वभूमीवर दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहरने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. करणच्या आगामी ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’चा टीझर आदिपुरुषबरोबर चित्रपटगृहात प्रदर्शित करण्यात येणार आहे. ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’मध्ये अभिनेता रणवीर सिंह आणि अभिनेत्री आलिया भट्ट मुख्य भूमिका साकारणार आहे. काही आठवड्यांपूर्वी या चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले होते आता लवकरच या सिनेमाचा टीझर प्रदर्शित करण्यात येणार आहे.

हेही वाचा : पतीवर सेक्स स्कॅण्डलचा आरोप अन्…; ‘द ट्रायल…’ वेब सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित, काजोलचे ओटीटीवर दमदार पदार्पण

‘आदिपुरुष’ येत्या १६ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याच दिवशी आदिपुरुष चित्रपटाबरोबर ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’चा १ मिनिट १९ सेकंदाचा टीझर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ‘रॉकी और रानी…’च्या निमित्ताने करण जोहरने तब्बल ७ वर्षांनी दिग्दर्शकाची जबाबदारी सांभाळली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आलिया भट्ट, रणवीर सिंह यांच्याशिवाय या चित्रपटात दिग्गज अभिनेत्री जया बच्चन, अभिनेते धर्मेंद्र, शबाना आझमी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. २८ जुलै रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.