शाहरुख खानच्या ‘पठाण’ने बॉक्स ऑफिसवर वेगळाच इतिहास रचला, आणि यानंतर आता ‘यश राज स्पाय युनिव्हर्स’च्या पुढील चित्रपटांची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत. लवकरच यामध्ये सलमान खानच्या ‘टायगर ३’ची एन्ट्री होणार आहे तर हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ यांच्या ‘वॉर’ या चित्रपटाचा पुढचा भागही याच स्पाय युनिव्हर्सशी जोडलेला असणार आहे. ‘पठाण’मध्ये याबद्दलचे काही संदर्भदेखील देण्यात आले होते.

नुकतंच या ‘वॉर २’बद्दल नवीन माहीती समोर आली होती. ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाचा दिग्दर्शक अयान मुखर्जी हा ‘वॉर २’ या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार असल्याचं स्पष्ट झालं. आता यानंतर या चित्रपटाच्या चाहत्यांसाठी आणखी एक नवीन बातमी समोर आली आहे. या चित्रपटात आता हृतिक रोशनबरोबर आणखी एक मोठा दाक्षिणात्य सुपरस्टार झळकणार आहे.

आणखी वाचा : “हा चित्रपट आणखी…” नागराज मंजुळेंनी केला ‘झुंड’ला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल खुलासा

‘पिंकव्हीला’च्या वृत्तानुसार यश राज फिल्म्सच्या या स्पाय युनिव्हर्समध्ये आता एका दाक्षिणात्य सुपरस्टारची एन्ट्री होणार आहे. आदित्य चोप्रा यांनी ‘वॉर २’मध्ये हृतिक रोशनसह ज्युनिअर एनटीआर यालाही घेण्याबद्दल माहीती दिली आहे. हा चित्रपट संपूर्णपणे पॅन इंडिया स्तरावर प्रदर्शित करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचं आदित्य चोप्रा यांनी स्पष्ट केलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ज्युनिअर एनएटीआरची ‘वॉर २’मध्ये वर्णी लागल्याने त्याचे चाहते चांगलेच उत्सुक झाले आहेत. हृतिक रोशनसह ज्युनिअर एनटीआरची केमिस्ट्री पडद्यावर बघण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत. ‘वॉर’ हा चित्रपट २०१९ साली प्रदर्शित झाला होता. त्यात हृतिक रोशनसह टायगर श्रॉफ मुख्य भूमिकेत होता. प्रेक्षकांनी हा चित्रपट चांगलाच डोक्यावर घेतला होता. आता याचा पुढील भाग ‘यश राज स्पाय युनिव्हर्स’शी जोडला जाणार आहे.