नेटफ्लिक्सची पहिली भारतीय वेबसीरिज ‘सेक्रेड गेम्स’ प्रचंड लोकप्रिय झाली. याच्या दुसऱ्या सीझनपेक्षा पहिला सीझन लोकांनी डोक्यावर घेतला त्यामागे बरीच कारणं होती, त्यापैकीच एक कारण म्हणजे अभिनेत्री कुब्रा सैत हिने साकारलेली कुक्कु ही भूमिका. एका तृतीयपंथी व्यक्तीची अत्यंत बोल्ड भूमिका साकारल्याने कुब्राला चांगलीच लोकप्रियता मिळाली. नंतर तिने काही चित्रपटातही काम केलं.

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या शाहिद कपूरच्या ‘फर्जी’ या वेबसीरिजमध्येही कुब्राची महत्त्वाची भूमिका होती. गेल्याच वर्षी कुब्राने तिचं आत्मचरित्र ‘ओपन बुक : नॉट क्वाइट अ मेमॉयर’ प्रकाशित केलं. या आत्मचरित्रात तिने तिच्या खासगी आणि व्यावसायिक आयुष्यातील बऱ्याच घडामोडींवर प्रकाश टाकला आहे. याच पुस्तकात मुंबईत आल्यानंतर अभिनेता सोनू सूदने कशी मदत केली याविषयी कुब्राने खुलासा केला आहे.

आणखी वाचा : ‘जवान’चं चित्रीकरण पूर्ण, शाहरुख खानने रचला नवा विक्रम; लवकरच येणार चित्रपटाचा टीझर

आपल्या पुस्तकात सांगितल्याप्रमाणे कुब्रा आधी मायक्रोसॉफ्ट या कंपनीमध्ये दुबई येथे कमाला होती. नंतर एकाफोटोशूटसाठी तिला मुंबई गाठायची होती, पण नेमका तेव्हाच २६/११ चा आतंकवादी हल्ला झाला आणि सगळं जग हादरलं. कुब्राने तिचं फ्लाइट तिकीट रद्द केलं आणि मुंबईचा फोटोग्राफर मुन्नालाही फोटोशूट रद्द करायला सांगितलं. त्याने कुब्राला समजावलं, तो म्हणाला की, “या शहरात काहीही थांबत नसतं. तू थांबलीस तर कायमची मागे पडशील.” हे ऐकून कुब्राने पुन्हा ज्यादा पैसे देऊन तिकीट बुक केलं.

View this post on Instagram

A post shared by Who Wore What When (@who_wore_what_when)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुन्ना एस हा मुंबईतील एक प्रतिथयश फोटोग्राफर असून त्याची ओळख अभिनेता सोनू सूदनेच करून दिल्याचं कुब्राने पुस्तकात सांगितलं आहे. सोनूच्या शब्दाखातर त्याने कुब्राला १६ फोटोच्या फोटोशूटसाठी तब्बल ५५% सूटही दिली. फोटोशूट झालं आणि जेव्हा कुब्राच्या हातात फोटो पडले तेव्हा मात्र तिच्या ध्यानात आलं की हे सगळे फोटोशॉपवर एडिट केलेले आहेत. कुब्राने पुस्तकात लिहिलं की, “माझे फोटो हे फोटोशॉपमध्ये चांगलेच एडिट केले होते, माझी कंबर बारीक करण्यात आली होती, माझं क्लिवेज वाढवण्यात आली होती, माझी त्वचा आणखीन साफ दिसत होती.”