Saif Ali Khan Recalled The Time He First Met Kareena Kapoor : सैफ अली खान बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेता आहे, तर सैफ व करिना हे इंडस्ट्रीतील लोकप्रिय सेलिब्रिटी कपल आहे. दोघांमध्ये दहा वर्षांचं वयाचं अंतर आहे. या दोघांची प्रेमकहाणीसुद्धा तितकीच प्रसिद्ध आहे. दोघांची पहिली भेट कुठे झाली होती आणि तेव्हा करीनाबद्दल सैफची काय प्रतिक्रिया होती याबाबत त्याने सांगितलेलं.
‘इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तानुसार एका जुन्या व्हिडीओमध्ये सैफने करीनाबद्दलची त्याची पहिली प्रतिक्रिया सांगितली होती. त्याने पहिल्यांदा करीनाला पाहिलं तेव्हा अभिनेत्री लहान होती व तो तिला ही छोटी मुलगी कोण आहे असं म्हणालेला. सैफ करीनाबद्दल नेमकं काय म्हणालेला आणि त्यांची पहिली भेट कशी होती जाणून घेऊयात.
सैफ अली खानची करीन कपूरबद्दल ‘अशी’ होती पहिली प्रतिक्रिया
सैफ करीनाबद्दल म्हणालेला, “जेव्हा मी तिला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा मी फिल्मिस्तान स्टुडिओमध्ये शूटिंग करत होतो. तेव्हा तिथे मेकअप रुमच्या बाहेर एक छोटी मुलगी बसलेली. भिंतीशेजारी ती एकटीच बसली होती आणि माझ्याकडे बघत होती. तेव्हा मी तिथे कोणाला तरी विचारलं की, कोण आहे ही? त्यावर त्यांनी मला सांगितलं की, ती करीना कपूर आहे. करीश्मा कपूरची धाकटी बहीण. मला वाटलेलं ती खूप सुंदर आहे आणि कदाचित तेव्हापासूनच मला ती आवडत होती.”
सैफ व करीना यांची प्रेमकहाणी खूप काळानंतर ‘टशन’ या चित्रपटाच्या सेटवर २००८ साली सुरू झाली. याच चित्रपटाच्या सेटवर दोघोंमध्ये प्रेम फुललं होतं. त्यानंतर ही जोडी अनेकदा एकत्र फिरताना दिसली आणि नंतर काही वर्षांनी दोघांनी २०१२ साली एकमेकांसह लग्न केलं. त्यावेळी करीना व सैफ यांचं लग्न बराचकाळ चर्चेचा विषय ठरलं होतं.
करीनापूर्वी सैफने अभिनेत्री अमृता सिंहबरोबर लग्न केलं होतं. या दोघांनी १९९१ मध्ये लग्न केलं होतं. लग्नानंतर दोघांना सारा व इब्राहिम अशी दोन मुलं झाली, परंतु लग्नाच्या १३ वर्षांनंतर दोघांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर काही वर्षांनी सैफ अली खानने अभिनेत्री करीना कपूरसह लग्न केलं. सैफ व करीना यांना तैमूर व जेह अशी दोन मुलं आहेत.
दरम्यान, सैफ अली खानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं, तर सैफ अली खान नुकताच ‘ज्वेल थिफ’ या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेतून झळकला होता. यासह तो ‘देवरा पार्ट १’, ‘आदिपुरुष’, ‘विक्रम वेधा’ यांसारख्या चित्रपटांतही झळकलेला. सैफ अली खानने आजवर अनेक चित्रपटांमध्ये वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.