गेल्या काही वर्षात सोशल मीडिया वापराचे प्रमाण खूप वाढलं आहे. मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकार सोशल मीडियावर सक्रिय राहून त्यांच्या आयुष्याबद्दलच्या महत्त्वाच्या घडामोडी त्यांच्या चाहत्यांशी शेअर करत असतात. त्याचप्रमाणे चित्रपटाचं प्रमोशनही ते सोशल मीडियावर करतात. पण तसं जरी असलं तरी काही कलाकार मात्र सोशल मीडियापासून लांब राहणं पसंत करतात. त्यातलाच एक कलाकार म्हणजे सैफ अली खान.

आताच्या घडीला जवळपास सगळेच कलाकार इन्स्टाग्रामवर सक्रिय असतात. चित्रपटाच्या प्रमोशनसाठीही हे माध्यम खूप प्रभावी आहे. पण तसं जरी असलं तरी सैफ अली खानने अजूनपर्यंत त्याचं इन्स्टाग्राम आपण अकाउंट ओपन केलेलं नाही. यामागचं कारण त्याने एका मुलाखतीत सांगितलं.

आणखी वाचा : शाहरुख खानच्या ‘मन्नत’ या बंगल्याला लागली नवी ‘डायमंड’ नेमप्लेट, फोटो व्हायरल

सैफ अली खानने नुकतीच ‘सीएनबीसी- टीव्ही 18’ या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याला “करीना कपूर सोशल मीडियावर सक्रिय असते पण तू सोशल मीडियापासून लांब का आहेस? असं विचारण्यात आलं. या प्रश्नाचं उत्तर देताना तो म्हणाला, “मी खूप फोटोजेनिक आहे. माझ्याकडे माझे आतापर्यंत समोर न आलेले खूप फोटो आहेत. मी ते सोशल मीडियावर पोस्ट करू शकतो पण कुणी म्हणतं हा फोटो नको शेअर करू, तो फोटो नको शेअर करू. त्यामुळे मला माझं सोशल मीडिया अकाउंट मॅनेज करू शकेल असा एक मॅनेजर पहावा लागेल.”

हेही वाचा : नेपोटिझमचा मुद्दा चर्चेत असतानाच करण जोहर आता ‘या’ लोकप्रिय स्टारकिडला देणार बॉलिवूड पदार्पणाची संधी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे त्याने सांगितलं, “लोक मला म्हणतात की मी असं जर माझे फोटो पोस्ट केले नाहीत तर तो मी माझ्यावरच केलेला अन्याय असेल. मी फोटो पोस्ट करेनही पण त्यावर येणाऱ्या कमेंट्स या माझ्यासाठी त्रासदायक ठरू शकतात. मला या सगळ्यामध्ये फसायचं नाही. फक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून मिळणारे पैसेच एक दिवस मला इन्स्टाग्राम अकाउंट बनवायला प्रवृत्त करू शकतो.”