Saiyaara Public Review : मोहित सुरी दिग्दर्शित ‘सैयारा’ या सिनेमाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. अनन्या पांडेचा चुलत भाऊ अहान पांडेने या सिनेमातून बॉलीवूडमध्ये एन्ट्री घेतली आहे. अहानचा हा पहिलाच चित्रपट असून त्याच्यासह प्रमुख भूमिकेत अभिनेत्री अनीत पड्डा झळकली आहे. अनीतने यापूर्वी काजोलची मुख्य भूमिका असलेल्या ‘सलाम वेंकी’मध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती.
अनन्या पांडेने २०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘स्टुडंट ऑफ द इयर २’ मधून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. तिचा पहिला सिनेमा बॉक्स ऑफिसवर अपेक्षित यश मिळवू शकला नव्हता, त्यामुळे अहानच्या पहिल्या सिनेमाचं काय होणार याकडे सिनेप्रेमींचं लक्ष लागलं होतं. मात्र, मोहित सुरी दिग्दर्शित ‘सैयारा’ला ॲडव्हान्स बुकिंगमध्येच जबरदस्त प्रतिसाद मिळाल्याचं पाहायला मिळत आहे.
‘सैयारा’ सिनेमाने ॲडव्हान्स बुकिंगमध्ये ९.३९ कोटींची रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. या सिनेमाची ३.८ लाख तिकिटं प्रदर्शनाच्या आधीच खरेदी करण्यात आली होती. दोघंही नवोदित कलाकार असून ॲडव्हान्स बुकिंगला भरभरून प्रतिसाद मिळाला. ‘सैयारा’ने ॲडव्हान्स बुकिंगमध्ये सलमान खान, आमिर खान आणि अक्षय कुमारच्या २०२५ मध्ये प्रदर्शित झालेल्या सिनेमांना मागे टाकलं आहे.
प्रेक्षकांना Saiyaara कसा वाटला जाणून घ्या…
एक युजर लिहितो, “अहान पांडेची एन्ट्रीच कमाल आहे. त्याने सहज सुंदर अभिनय केलाय…त्याचा स्क्रीन प्रेझेन्स सिनेमा पाहताना जाणवतो. चित्रपटाचं म्युझिक उत्तमच आहे फक्त, अहानच्या संवाद शैलीत थोडी समस्या मला जाणवली. पण, मोहित सुरीने ‘आशिकी २’च्या झोनमध्ये सर्वांना नेलं असं म्हणायला हरकत नाही.”
दुसरा युजर लिहितो, “या सिनेमाकडून खरंच एवढी अपेक्षा नव्हती. पण सैयारा खरंच सुंदर आहे.”
चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी “एका शब्दात सांगायचं झालं, तर हा सिनेमा आऊटस्टँडिंग आहे” अशी प्रतिक्रिया दिली आहे.
दरम्यान, आता ‘सैयारा’चं बॉक्स ऑफिस कलेक्शन किती होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या आठवड्यात ‘सैयारा’सह ‘तन्वी द ग्रेट’ आणि ‘निकिता रॉय’ हे सिनेमे प्रदर्शित झाले आहेत.