बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचे कित्येक किस्से आपण ऐकून आहोत. त्याच्या मनाचा मोठेपणा आणि कित्येक कलाकारांना अभिनेत्रींना त्याने दिलेली संधी यामुळे कायम त्याची बॉलिवूडमध्ये चर्चा होते. काळवीट शिकार असो किंवा फुटपाथ अपघात प्रकरण असो सलमानच्या चांगुलपणाची आणि तो करतो त्या चॅरिटीची चांगलीच चर्चा होते. सलमानच्या याच स्वभावाबद्दल अभिनेत्री आयेशा झुलका हिने खुलासा केला आहे. १९९१ च्या ‘कुरबान’ या चित्रपटातून चक्क सलमान खानबरोबर तिने चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं.

तेव्हापासून सलमानबरोबर तिचे फार चांगली मैत्रीचे संबंध आहेत. त्यादरम्यान सेटवर आलेले अनुभव आयेशाने शेअर केले आहेत. सलमान ‘बीइंग ह्युमन’ नावाची एक संस्था चालवतो ज्यामधून तो गरजू मुलांना मदत करतो. त्याच्या या स्वभावाचा आणखीन एक पैलू आयेशा झुलकाने ‘मिड-डे’ या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये उलगडून दाखवला आहे.

आणखी वाचा : सैफ अली खानचा ‘रावण’ पाहून प्रेक्षकांचा राग अनावर, कुणी तैमूरशी तर कुणी खिलजीशी केली तुलना

आयेशा म्हणाली, “मी सलमानची खूप मोठी फॅन आहे. एक खूप चांगला माणूस आहे. आम्ही जेव्हा एकत्र काम करायचो तेव्हा काम संपवून घरी जाताना सेटवरचं उरलेलं अन्न तो जमा करायचा आणि कितीही उशीर झाला तरी घरी जाताना गाडीतून उतरून रस्त्यावरील गरजू भुकेल्या लोकांमध्ये आणि भिकाऱ्यांमध्ये तो ते अन्न वाटायचा. तो उत्तम अभिनेता आहेच पण एक प्रेमळ माणूसही आहे.”

View this post on Instagram

A post shared by prime video IN (@primevideoin)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘कुरबान’चित्रपटातून ब्रेक मिळाल्यावर आयेशाने ‘खिलाडी’, ‘जो जिता वही सिकंदर’ सारख्या मोठ्या चित्रपटातून स्वतःचं नाव कामावलं. नुकतंच आयेशाने प्राइम व्हिडिओ या ओटीटी प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ‘हश हश’ या वेबसीरिजमधून कमबॅक केला आहे. यामध्ये तिच्याबरोबर जुही चावलासुद्धा मुख्य भूमिकेत आहेत. सलमानही लवकरच ‘गॉडफादर’, ‘टायगर ३’, ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.