सलमान खान आणि कतरिना कैफचा बहुचर्चित, बहुप्रतिक्षित चित्रपट टायगर ३ आज (१२ नोव्हेबरला) प्रदर्शित झाला. प्रेक्षकांकडून या चित्रपटाला जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. प्रदर्शनाच्या आधीच अॅडव्हान्स बुकिंगमधून या चित्रपटाने कोट्यावधींची कमाई केली आहे.

हेही वाचा- शाहरुख खान-काजोलची पहिली भेट कुठं झाली होती? स्वत: अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली…

‘टायगर ३’ चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच ऑनलाइन साइट्सवर लीक झाला आहे. तमिळरॉकर्स, टेलिग्राम, मूवीरुलज मुव्हिजरुल्झ आणि इतर पायरसी साइट्सवर टायगर ३ लीक करण्यात आला आहे. हा चित्रपट ऑनलाइन बघण्याबरोबरच डाऊनलोडही करता येणं शक्य आहे. त्यामुळे चित्रपटाच्या कमाईवर याचा थोडा फार परिणाम होणार असल्याने निर्मात्यांची चिंता वाढली आहे.

View this post on Instagram

A post shared by Emraan Hashmi (@therealemraan)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘टायगर ३’ ‘यशराज फिल्म्स’च्या ‘स्पाय युनिव्हर्स’मधला हा पाचवा चित्रपट आहे. या चित्रपटात सलमान, कतरिनाबरोबरच इमरान हाश्मीचीही मुख्य भूमिका आहे. इमरानने या चित्रपटात नकारात्मक भूमिका साकारली आहे. टायगर ३ मध्ये सलमान आणि कतरिनाबरोबर इमरानचेही अॅक्शन सीन्स बघायला मिळत आहेत. मनीष शर्मा दिग्दर्शित ‘टायगर ३’ हिंदीबरोबरच तामिळ व तेलुगु भाषेतही प्रदर्शित झाला आहे.