scorecardresearch

भाईजानच्या चाहत्याने शाहरुख खानला डिवचलं; किंग खान ट्वीट करत म्हणाला, “सलमान म्हणजे…”

शाहरुखने ‘AskSRK’ हा हॅशटॅग पुन्हा वापरत त्याच्या चाहत्यांशी संवाद साधला

salman khan shahrukh khan
फोटो : इंडियन एक्सप्रेस

बॉलिवूडचा किंग खान अशी ओळख असणारा शाहरुख खान हा सातत्याने चर्चेत आहे. शाहरुखच्या ‘पठाण’ चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई केली. या चित्रपटाने अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत. आता पठाणच्या तिसऱ्या दिवसाच्या कमाईचे अंदाजे आकडे समोर आले आहेत. बुधवारी २५ जानेवारीला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्या दिवशी ५७ कोटींची कमाई केली.

कोणत्याही मुलाखतीशिवाय केवळ ट्रेलर, गाणी आणि थेट चाहत्यांशी संवाद यांच्या माध्यमातून शाहरुख आणि ‘पठाण’ची टीम या चित्रपटाचं प्रमोशन करत होती. चित्रपट हीट झाल्यावरसुद्धा नुकतंच शाहरुखने सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘AskSRK’ हा हॅशटॅग पुन्हा वापरत त्याच्या चाहत्यांशी संवाद साधला. या ट्रेंडमधून शाहरुखने त्याच्या चाहत्यांना प्रश्न विचारायला सांगितले आहेत आणि त्यातील काही ठराविक लोकांच्या प्रश्नांना त्याने उत्तरं दिली.

आणखी वाचा : ‘पठाण’मधील सलमान-शाहरुखच्या ‘त्या’ सीनबद्दल राकेश रोशन यांनी केलं वक्तव्य; म्हणाले…

बऱ्याच लोकांनी चित्रपट हीट झाल्यावर कसं वाटत आहे, एकूण कलेक्शन किती आहे असे प्रश्न विचारले आहे. तर एका सलमान खानच्या चाहत्याने शाहरुखला चांगलंच डिवचलं आहे. तरी त्या चाहत्याला शाहरुख खानने दिलेलं उत्तर चांगलंच चर्चेत आहे. सलमानच्या एका चाहत्याने शाहरुखला टॅग करत ट्वीट केलं, “पठाण तर सुपरहीट झाला आहे, पण तू बॉक्स ऑफिसवर सलमान खानचा सामना करू शकणार नाहीस.”

या या ट्वीटला शाहरुखने अत्यंत धमाल उत्तर दिलं आहे, ज्यामुळे त्याने सलमानच्या चाहत्यांचीही मनं जिंकली आहेत. शाहरुखने याला उत्तर देत ट्वीट केलं की, “सलमान भाई हा म्हणजे..आजच्या तरुण मुलांच्या भाषेत काय म्हणतात ना ते, GOAT (greatest of all time), खरंच तो ग्रेट आहे.” शाहरुखच्या या उत्तराने कित्येकांची मनं जिंकली आहेत. चित्रपटातील शाहरुख आणि सलमानमधल्या त्या सीनची भरपूर चर्चा रंगत आहे. खूप वर्षांनी प्रेक्षकांना त्यांचे लाडके सुपरस्टार एकत्र मोठ्या पडद्यावर पाहायला मिळाले आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-01-2023 at 16:46 IST
ताज्या बातम्या