सलग ३ चित्रपट फ्लॉप झाल्यावर गेल्यावर्षी म्हणजेच २०२३ मध्ये सलमान खानने ‘टायगर ३’मधून कमबॅक केलं. सलमानच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली. आता या चित्रपटानंतर सलमानच्या ‘दबंग ४’ची चर्चा सुरू आहे. आता याविषयी एक नवी माहिती समोर येत आहे. लवकरच सलमान खान ‘दबंग ४’बद्दल घोषणा करणार असून या चित्रपटासाठी शाहरुख खानच्या ‘जवान’चा दिग्दर्शक अॅटलीशी चर्चा सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार सलमान आणि अरबाज खान हे ‘दबंग’च्या प्रीक्वलवर काम करणार आहेत. ‘दबंग’मधील चुलबुल पांडे या पात्राचा स्पिन ऑफ चित्रपटावर सलमान खान करत असल्याची चर्चा होताना दिसत आहे. सलमानच्या जवळच्या व्यक्तीने ‘बॉलिवूड हंगामा’ला सांगितल्यानुसार सलमान त्याच्या या अजरामर चुलबुल पांडे या पात्राला एका वेगळ्याच ढंगात प्रेक्षकांसमोर सादर करू इच्छित आहे.

आणखी वाचा : करण जोहरने दणक्यात साजरा केला यश व रूहीचा वाढदिवस; इंस्टाग्राम पोस्ट शेअर करत मुलांना दिल्या सदिच्छा

यासाठी सलमान आणि अरबाज यांनी दिग्दर्शक अॅटलीची भेट घेतली आहे. दोन ते तीन वेळा या तिघांची भेट झाली असून सलमानचा ‘दबंग’ची पॅन इंडिया फ्रेंचाइज बनवण्याचा मनसुबा आहे. अॅटली या चित्रपटाचं लिखाण करणार आहे, पण तो याचं दिग्दर्शन करणार नसल्याचं सांगितलं जात आहे. परंतु सलमान आणि अरबाजसह अॅटली या चित्रपटाच्या निर्मितीत सहभाग घेणार आहे.

याआधीपण सलमानच्या ‘दबंग ४’बद्दल अपडेट समोर आले होते. सलमान यासाठी खूप उत्सुक होता आणि मध्यंतरी त्याने लेखक व दिग्दर्शक तिग्मांशु धूलिया यांना या नव्या चित्रपटाची कथा लिहिण्यासाठी सांगितलं होतं. चूलबूल पांडे या पात्राचा राजकारणातील प्रवास यावर बेतलेलं एक कथानक तिग्मांशु धूलिया यांनी सलमान आणि अरबाजच्या सांगण्यावरुन तयार केलं. तेव्हा ही कथा या दोघांना पसंत पडली नसल्याने त्यांनी या चित्रपटाचा विचार तेव्हा थांबवला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आता पुन्हा ‘दबंग ४’ची चर्चा होऊ लागली आहे, त्यामुळे सलमानच्या चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे. ३५ वर्षांच्या करिअरमध्ये सलमान खान लवकरच ‘द बूल’ या बायोपिकमध्ये झळकणार आहे. याबरोबरच सलमान ‘टायगर वर्सज पठाण’वरही लवकरात लवकर काम सुरू करणार आहे.