बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा ‘किसी का भाई किसी की जान’ हा चित्रपट आज(२१ एप्रिल) सगळीकडे प्रदर्शित झाला. ईदच्या मुहुर्तावर सलमानने त्याच्या चाहत्यांना खास गिफ्ट दिलं. परंतु, प्रदर्शनाच्या दिवशीच सलमानचा ‘किसी का भाई किसी की जान’ चित्रपट ऑनलाइन लीक झाला आहे. त्यामुळे सलमान खानची चिंता वाढली आहे.

‘बॉलिवूड लाइफ’ने दिलेल्या वृत्तानुसार, किसी का भाई किसी की जान हा चित्रपट तमिळ रॉकर्स, टेलिग्राम व इतर अन्य साइटवर लीक झाला आहे. याव्यतिरिक्तही अनेक बॉलिवूड व इतर भाषांमधील चित्रपट ऑनलाइन साइटवर लीक झाले आहेत.

हेही वाचा>> “एलॉन मस्क राजकारण्यांना घाबरतो”, ट्वीटरने ब्लू टिक काढल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्याचं ट्वीट, म्हणाला “मी पैसे…”

‘किसी का भाई किसी की जान’ चित्रपट एका दाक्षिणात्य चित्रपटाचा रिमेक आहे. या चित्रपटात सलमान खानचा हटके अंदाज पाहायला मिळत आहे. ‘किसी का भाई किसी की जान’ चित्रपटातील गाण्यालाही प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. सलमान खान आणि झी स्टुडिओने या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

हेही वाचा>> केदार शिंदेंच्या लेकीने शेअर केला शाहीर साबळे यांच्याबरोबरचा बालपणीचा फोटो, दोघांमधील नेमकं नातं काय?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘किसी का भाई किसी की जान’ चित्रपटात सलमान खान व दाक्षिणात्य अभिनेत्री पूजा हेगडे मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटात व्यंकटेश, भूमिका चावला, शहनाज गिल, राघव जुयाल, सिद्धार्थ निगम, जगपती बाबू, विजेंदर सिंग, पलक तिवारी आणि जस्सी गिल हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत असणार आहेत.