बॉलिवूडचा बजरंगी भाईजान म्हणून अभिनेता सलमान खानला ओळखले जाते. बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता म्हणून त्याची ओळख आहे. बॉलिवूडमधील सर्वाधिक महागड्या कलाकारांपैकी तो एक आहे. सलमान खान हा त्याच्या प्रोफेशनल आयुष्याबरोबरच वैयक्तिक गोष्टींमुळेही चर्चेत असतो. सलमान खानने नुकतंच अरबाज खान आणि सोहेल खान या दोघांच्या घटस्फोटावर अप्रत्यक्षरित्या प्रतिक्रिया दिली.

सलमान खानचा ‘किसी का भाई किसी की जान’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कॉमेडियन कपिल शर्माच्या शोमध्ये हजेरी लावली. या शो दरम्यान सलमान खानने अरबाज खान आणि सोहेल खानच्या घटस्फोटाची खिल्ली उडवली.
आणखी वाचा : “माझ्या नवऱ्याचं दुसरं लग्न अन् चर्चा मात्र बोल्ड फोटोशूटची”, पल्लवी पाटीलने सांगितला ‘तो’ किस्सा, म्हणाली “ही वेळ…”

या दरम्यान कपिल शर्माने सलमानला विविध प्रश्न विचारले. “सलमान भाई, आम्ही तुझ्या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये पाहिले की तुझे तीनही भाऊ तुला लग्नासाठी तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. हे दृश्य पाहिल्यानंतर तुझे रिअल लाईफ भाऊ अरबाज आणि सोहेल यांनी तुम्हाला काही प्रतिक्रिया दिली नाही का? यावेळी अरबाज आणि सोहेलने आमचं कधीच ऐकलं नाही, तुमचं काय ऐकणार आहेत, असं तो सीन पाहून म्हटलं नाही का?” असे कपिल शर्माने त्याला गंमतीत म्हटले.

Bhoi joking about his brothers getting divorced
byu/HardTune272 inBollyBlindsNGossip

त्यावर सलमान खान म्हणाला, “त्यांनी माझे कधीच ऐकले नाही. पण आता ऐकत आहे. त्याचे हे वक्तव्य ऐकून सर्वजण जोरजोरात हसू लागले.”

आणखी वाचा : सलमान खानच्या नव्या बुलेटप्रूफ कारच्या नंबर प्लेटमागे नेमकं दडलंय काय?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सलमान खानचा ‘किसी का भाई किसी की जान’ हा चित्रपट येत्या २१ एप्रिलला चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. या चित्रपटाने आतापर्यंत १०० कोटींचा गल्ला जमवला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन फरहाद सामजी यांनी केले आहे. या चित्रपटाव्यतिरिक्त सलमान खान लवकरच ‘टायगर ३’ चित्रपटात दिसणार आहे. मनीष शर्मा दिग्दर्शित हा चित्रपट २०२३ मध्ये प्रदर्शित होणार आहे.