सगळीकडे गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळत आहे. पाच दिवसांच्या गणरायाचे विसर्जन करण्यात आले असून १० दिवसांच्या गणरायाचे विसर्जन अनंत चतुर्दशीला केले जाईल. अनेक ठिकाणी भाविक बाप्पाच्या दर्शनाला जात आहेत. सेलिब्रिटीही इतरांच्या घरी जाऊन बाप्पाचे आशीर्वाद घेत आहेत. अशातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या घरी अभिनेते शाहरुख खान व सलमान खान यांनी बाप्पाच्या दर्शनासाठी हजेरी लावली.

Video: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सलमान खानसह पोहोचले अर्पिता खानच्या घरी, बाप्पाचे दर्शन घेत फोटोही काढले

शाहरुख खान निळ्या रंगाचा कुर्ता घालून मुख्यमंत्र्यांच्या घरी पोहोचला. तर सलमान खान लाल रंगाचा कुर्ता घालून पोहोचला होता. त्यांनी बाप्पाचे दर्शन घेत आशीर्वाद घेतले आणि नंतर त्यांनी मुख्यमंत्री शिंदेंबरोबर फोटोसाठी पोज दिल्या. सलमान खान व शाहरुख खान दोन्ही बाजूने व मध्ये मुख्यमंत्री शिंदे उभे होते. या तिघांचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांनी देखील मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी जाऊन बाप्पाचे दर्शन घेतले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांचे स्वागतही केले.

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, चार दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सलमान खानबरोबर त्याची बहीण अर्पिता खानच्या घरी गणरायाच्या दर्शनाला गेले होते. दोघेही एकत्र तिथे पोहोचले होते. नंतर त्यांनी बाप्पाचे दर्शन घेत फोटो काढले. त्यानंतर आता सलमान व शाहरुख मुख्यमंत्र्यांच्या घरी दर्शनाला गेले.