बॉलीवूडचा दबंग सलमान खानसारखाच त्याचा बॉडीगार्ड शेराही अनेकदा चर्चेत असतो. गेल्या २८ वर्षांपासून शेरा सलमानसोबत सावलीसारखा वावरत आहे. सलमान आणि शेरामध्ये खास नातं आहे. सलमान शेराला आपल्या भावाप्रमाणे मानतो. आज शेराचा वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्त सलमानने शेराला खास भेट दिली आहे.
सलमान खानने इन्स्टाग्रामवर शेरासोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे. हा सलमान आणि शेराचा जुना फोटो आहे. फोटोमध्ये शेराने सलमानच्या खांद्यावर हात ठेवला आहे. हा फोटो सलमान खानच्या घरी क्लिक करण्यात आला आहे. हा फोटो पोस्ट करीत सलमानने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘हॅपी बर्थ डे शेरा, देव तुम्हाला आशीर्वाद देवो. नेहमी आनंदी राहा.’ या पोस्टमध्ये सलमानने शेरालाही टॅग केले आहे. सलमान खानची एक्स गर्लफ्रेण्ड संगीता बिजलानीने या पोस्टवर हॅपी बर्थ डे शेरा.’ कमेंट करीत शेराला शुभेच्छा दिल्या आहेत, ‘सलमानच्या या पोस्टला उत्तर देताना शेराने कमेंट सेक्शनमध्ये ‘धन्यवाद मालिक’ असे लिहिले आहे.
शेरा सलमानला ‘मालिक’ म्हणून का हाक मारतो
बॉडीगार्ड शेरा सलमान खानच्या जवळच्या व्यक्तीमधील एक आहे. शेरा सलमानला नेहमी ‘मालिक’ म्हणून हाक मारतो. तो सलमानला मालिक का म्हणतो याबाबत एका मुलाखतीत शेराने खुलासा केला आहे. ‘मलिक म्हणजे गुरु, सलमान मलिक माझ्यासाठी सर्वस्व आहे. त्यांच्यासाठी मी माझा जीवही देऊ शकतो. तो माझा देव आहे’. ‘जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मी माझ्या भावासोबत असेन, मी नेहमी मालिक (सलमान खानच्या) पुढे उभा राहतो. जेणेकरून माझ्या भावावर येणाऱ्या प्रत्येक संकटाला पहिला माझा सामना करावा लागेल.