Sikandar Ticket Price: सलमान खान आणि रश्मिका मंदाना यांच्या ‘सिकंदर’ चित्रपटाची क्रेझ सध्या मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. चहूबाजूला ‘सिकंदर’ चित्रपटाची चर्चा सुरू आहे. ३० मार्चला हा बहुचर्चित चित्रपट प्रदर्शित होणार आहे. प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. पण, ‘सिकंदर’ चित्रपटाच्या तिकिटाचे दर गगनाला भिडले आहेत. सिंगल स्क्रीनवर ‘सिकंदर’ची तिकिटं खूप महाग आहेत.

ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणारा ‘सिकंदर’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करणार असल्याचा अंदाज लावला जात आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी अवघे दोन दिवस बाकी आहेत. पण, त्याआधीच ‘सिकंदर’ चित्रपटाने कोट्यवधींची कमाई केली आहे. त्यातच तिकिटाचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. मेट्रो सिटीजमध्ये ‘सिकंदर’ची तिकिटं दोन हजारांहून अधिक रुपयांत विकली जात आहेत. २५ मार्चपासून ‘सिकंदर’ चित्रपटाच्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली आहे. तेव्हा पहिल्याच दिवशी या चित्रपटाची कोट्यवधींची तिकीट विकली गेली.

माहितीनुसार, मल्टिप्लेक्सने प्रीमियम तिकिटाचे दर वाढवले आहेत. दिल्लीतील साकेत येथील डीएलएफ मॉलमध्ये वीआयपी तिकिट ८०० रुपये आहे. तर नोएडाच्या मॉल ऑफ इंडियामध्ये सकाळच्या शोमध्ये रिक्लाइनरची किंमत १००० रुपये आहे. तर संध्याकाळच्या रिक्लाइनरची किंमत १४०० रुपयांपर्यंत पोहोचली आहे. मुंबईतील दादरच्या प्लाझा चित्रपटगृहातील संध्याकाळच्या शोसाठी रिक्लाइनर सीटची किंमत ७०० रुपयांपर्यंत आहे. तसंच मुंबईतील मल्टीप्लेक्स ‘डायरेक्टर कट’ किंवा ‘लक्स’ २२०० रुपयांत विकत आहेत. तर दिल्लीत हे तिकिट १६०० ते १९०० रुपयांत मिळत आहे.

‘सिकंदर’च्या तिकिटाचे दर गगनाला भिडले असूनही बऱ्याच ठिकाणी शो हाउसफुल्ल झाले आहेत. सॅकनिल्कच्या माहितीनुसार, आतापर्यंत ‘सिकंदर’ चित्रपटाची १, ३८,२०९ हून अधिक तिकिटं विक्री झाली आहेत. अ‍ॅडवान्स बुकिंगच्या माध्यमातून ‘सिकंदर’ने एकूण ४.०३ कोटींची कमाई केली आहे.

View this post on Instagram

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘सिकंदर’ चित्रपटाचं दिग्दर्शन ए.आर.मुरुगदॉस यांनी केलं आहे. या चित्रपटात सलमान खान, रश्मिका मंदाना व्यतिरिक्त काजल अग्रवाल, शर्मन जोशी, प्रतीक बब्बर झळकणार आहे. तसंच ‘बाहुबली ‘चित्रपटातील कटप्पा म्हणजे अभिनेता सत्यराज खलनायिकाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.