बॉलीवूडचा भाईजान सलमान खान याची लहान बहीण अर्पिता आणि तिचा पती अभिनेता आयुष शर्मा सध्या चर्चेत आले आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार, त्यांनी त्यांचे मुंबईमधील घर विकले आहे. मुंबईतील खार रोड परिसरातील त्यांची २,५०० स्क्वेअर फुटांची मालमत्ता त्यांनी विकली आहे. हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या माहितीनुसार, हे अपार्टमेंट त्यांनी २२ कोटी रुपयांना विकली आहे.

सलमान खानची बहीण अर्पिता व पती आयुष शर्माने ‘इतक्या’ कोटींना विकले घर

अर्पिता आणि आयुषने २०१७ मध्ये ही अपार्टमेंट १८ कोटींना विकत घेतली होती. या अपार्टमेंटला १६०० स्क्वेअर फुटांची टेरेस आणि नऊ कारसाठी पार्किंगची सुविधादेखील आहे. ही मालमत्ता शिवाय सिनेवाइज प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या कंपनीला विकण्यात आली आहे. १८ ऑक्टोबर रोजी या व्यवहाराची नोंदणी करण्यात आली असून, ३० हजार रुपयांच्या नोंदणी शुल्कासह १.३२ कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्कही भरण्यात आले.

ही अपार्टमेंट वांद्र्याजवळ कार्टर रोड, पाली टेकडी येथे आहे. या परिसरात अनेक लोकप्रिय कलाकार राहतात. सलमान खान आणि संपूर्ण कुटुंब वांद्र्यामध्ये जवळपासच राहते. शाहरुख खान, रणबीर कपूर, जॅकी श्रॉफ हे कलाकारदेखील याच परिसरात राहतात. अर्पिताने यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, समोर आलेल्या माहितीनुसार, ती तिच्या कुटुंबासह वरळी येथे स्थलांतरित झाली आहे.

अर्पिताचा पती आयुष शर्मा लवकरच इसाबेल कैफच्या क्वाथा या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट भारतीय सेनेच्या खऱ्या घटनांवर आधारलेला आहे.

हेही वाचा: Bigg Boss 18: चाहत पांडेने सलमान खानला घातली लग्नाची मागणी, भाईजान म्हणाला, “तुझ्या आईचं आणि…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, काही दिवसांपासून सलमान खानचे कुटुंब मोठ्या चर्चेत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार<a href="https://www.loksatta.com/about/ajit-pawar/"> गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. बिश्नोई गँगने अनेकदा सलमानला जीवे मारण्याची धमकी दिली आहे, त्यामुळे बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर सध्या सलमान खानच्या सुरक्षेतदेखील वाढ करण्यात आली आहे.सलमान खान सध्या ‘बिग बॉस १८’चे सूत्रसंचालन करीत आहे. त्याबरोबरच तो २०२५ मध्ये प्रदर्शित होणाऱ्या ‘सिकंदर’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.