हिंदी कलाविश्वाला रामराम ठोकणाऱ्या अभिनेत्री सना खानने आज गोंडस बाळाला जन्म दिला आहे. अनस सय्यदबरोबर २०२० मध्ये लग्नगाठ बांधल्यानंतर दोन वर्षांनी सना खान आई झाली. अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांना दिली.

हेही वाचा : आलिया सिद्दिकीने केला नवाजुद्दिनच्या गाण्यावर डान्स, व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले; म्हणाले, “आधी आरोप केलेस आता…”

सना खानने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत तिला मुलगा झाल्याची माहिती आपल्या चाहत्यांना दिली. याच्या कॅप्शनमध्ये सनाने, “अल्लाहच्या कृपेने आम्हाला गोंडस मुलगा झाला आहे. तुम्हा सर्वांचे आशीर्वाद आणि प्रेम माझ्या मुलाच्या पाठीशी कायम राहो” असे लिहिले आहे.

हेही वाचा : Video : गोड प्रेमकहाणीत थरारक ट्विस्ट, वरुण धवन आणि जान्हवी कपूरच्या ‘बवाल’ चित्रपटाचा टीझर पाहिलात का?

अभिनेत्रीच्या पोस्टवर सध्या नेटकरी शुभेच्छांचा वर्षाव करीत आहे. सना – अनसचे जवळचे मित्रमंडळी आणि कुटुंबीय यांनीही या दाम्पत्याला भावी आयुष्यासाठी तसेच आयुष्याच्या या नव्या इनिंगसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. सना आणि अनस एकमेकांना २०१७ मध्ये भेटले होते. पुढे २०१८ मध्ये इस्लाम धर्माच्या परिचयासाठी सनाने अनसला फोन केला होता. त्यानंतर दोन वर्षांनी दोघांनी लग्न केले.

हेही वाचा : ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’मध्ये शाहरुख खान दिसणार खास भूमिकेत? चाहत्याला उत्तर देत करण जोहर म्हणाला, “३ कॅमिओ…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, सना खान लग्नाआधी बॉलीवूड आणि हिंदी कलाविश्वात प्रचंड सक्रिय होती, ती ‘बिग बॉस ९’मध्येही सहभागी झाली होती. मात्र, २०२० मध्ये लग्न झाल्यावर तिने फिल्म इंडस्ट्री सोडली. इस्लाम धर्मासाठी इंडस्ट्री सोडत असल्याचे यापूर्वी तिने स्पष्ट केले होते. यापूर्वी अनेक मुलाखतींमध्ये सनाने ग्लॅमरस दुनियेपासून दूर होत तिने स्वतःला धर्मासाठी समर्पित केल्याचे म्हटले होते.