‘ॲनिमल’ हा २०२३ मधील ब्लॉकबस्टर चित्रपटांपैकी एक होता. चित्रपटाने जगभरात दमदार कमाई केली होती. यात रणबीर कपूर आणि रश्मिका मंदाना यांची जोडी मुख्य भूमिकेत दिसली होती. या चित्रपटात पहिल्यांदाच दोघांनी स्क्रीन शेअर केली होती. या चित्रपटातील तृप्ती डिमरी व रणबीर कपूर यांच्या इंटिमेट सीनची खूप चर्चा झाली होती. या चित्रपटात रणबीर कपूरचा एक न्यूड सीन होता. तो घराच्या बागेत न्यूड फिरताना दिसला होता. आता दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगाने या सीनबद्दल वक्तव्य केलं आहे. तो सीन कसा शूट झाला होता, तेही सांगितलं.

‘ॲनिमल’चा दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगाने गेम चेंजर्सशी बोलताना रणबीर कपूरच्या न्यूड सीनबद्दल सांगितलं. “‘ॲनिमल’च्या यशात जर कोणाचा मोठा वाटा असेल तर तो रणबीर आणि त्याच्या समजूतदारपणाचा होय,” असं तो म्हणाला. तसेच काही कलाकारांना विशिष्ट प्रकारचे सीन करण्यात अडचणी येतात, असंही त्याने नमूद केलं. संदीपच्या मते तो जे काही करायचा ते रणबीरला आवडायचं आणि तो ते करायला तयार व्हायचा.

संदीप सीनबद्दल रणबीरला विचारायचा, पण रणबीर म्हणायचा की दिग्दर्शकाला जे योग्य वाटतंय तो ते करेल. न्यूड सीनबाबत संदीप म्हणाला, रणबीरच्या मांड्या आणि कंबरेजवळच्या भागात प्रोस्थेटिक्स घालावे लागले होते. शॉटमध्ये तो परफेक्ट दिसत होता, पण शूट केल्यावर सीन चांगला दिसत नव्हता. पण प्रोस्थेटिक्समुळे फोकस केलेला सीन चांगला दिसत नव्हता, त्यामुळे त्यांनी फोकस न करता हा सीन शूट केला.

रणबीरने न्यूड सीन करायला लगेच दिला होकार

संदीप रेड्डी म्हणाला की काही कारणांमुळे कलाकार सहसा असे सीन करताना चिडचिड करतात. खासकरून जेव्हा प्रोस्थेटिक तयार करून ते घालावं लागतं, त्यासाठी बरेच तास घालवावे लागतात. पण रणबीरच्या बाबतीत असं नव्हतं. तो लगेच तयार झाला. कोणतीही चर्चा झाली नाही. फक्त १० मिनिटं दोघे बोलले आणि संदीपने त्याला समजावून सांगितलं की तो फोकस नसलेला सीन करेल. रणबीर तो सीन करायला तयार झाला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रणबीर कपूर व रश्मिका मंदानाच्या ‘ॲनिमल’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली होती. भारतात या चित्रपटाने एकूण कलेक्शन ६६० कोटी रुपये होते, तर जगभरात ८५० कोटींहून जास्त व्यवसाय केला होता. या चित्रपटात बॉबी देओल खलनायक होता. अनिल कपूर यांनी सिनेमात रणबीरच्या वडिलांची भूमिका केली होती.