दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा याचा ‘अॅनिमल’ चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत नवीन विक्रम रचले आहेत. त्याच्या ‘कबीर सिंग’ या चित्रपटाप्रमाणेच ‘अॅनिमल’ मध्येही आंतरजातीय प्रेमकथा दाखविण्यात आली आहे. पण चित्रपटांमध्ये आंतरजातीय संबंध दाखवण्याचा निर्णय जाणीवपूर्वक घेतला नव्हता, असा खुलासा त्याने केला आहे. या चित्रपटात रणबीर कपूर आणि रश्मिका मंदान्ना यांचा एक किसिंग सीन आहे. ते त्यांच्या कुटुंबियांसमोर एकमेकांना किस करतात. हा सीन त्यांची बंडखोरी दर्शवतो, असं तो म्हणाला.

‘गॅलाटा प्लस’ शी बोलताना संदीप रेड्डी वांगाला त्यांच्या आंतरजातीय संबंधांबद्दलच्या आकर्षणाबद्दल विचारण्यात आलं. “मी अनेक तेलुगू आणि तमिळ कुटुंबं दिल्लीत स्थायिक झालेली पाहिली आहेत. त्यामुळे कदाचित मला आंतर-राज्यीय आंतरजातीय विवाह पाहायला आवडत असावं,” असं तो म्हणाला. तर, रणबीर व रश्मिका हे कुटुंबियांसमोर एकमेकांना केस करतात. त्या सीनवेळी पार्श्वभूमीत एक रॉक गाणं वाजत असतं, याबाबत संदीप रेड्डी वांगा म्हणाला, “रॉकमध्ये एक बेपर्वाई आहे. त्यातून ते त्यांचा राग व्यक्त करत आहेत असं वाटतं. त्यातून त्यांचा निष्काळजीपणाही दिसून येतो.”

मराठमोळ्या अभिनेत्याने गुजराती अभिनेत्रीशी बांधली लग्नगाठ; शाही विवाहसोहळ्याचे खास फोटो आले समोर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या चित्रपटात बॉबी देओलने साकारलेले पात्र मुस्लीमच का आहे, यामागचं कारणही या मुलाखतीत दिग्दर्शकाने सांगितलं. “आपल्या वाईट काळात प्रत्येकाला आपल्या देवाची आठवण येते. काही जण चर्चमध्ये जातात, तर काही कोणत्यातरी बाबाकडे जाऊन तावीज बांधून घेतात. त्यांच्यासाठी तो एक पुनर्जन्मच असतो. हिंदू धर्मातून मुस्लीम आणि ख्रिश्चन धर्मात गेलेले बरेच लोक आपल्या आजूबाजूला दिसतात, पण इतर धर्मातील कुणालाच हिंदू धर्मात येताना आपण पाहिलेलं नाही. त्यामुळे ते पात्र मुस्लीम दाखवायचा मी निर्णय घेतला. एकाहून अधिक पत्नी दाखवण्यासाठी मला ते गरजेचं होतं. पुढील भागात याच कुटुंबातील वेगवेगळ्या भावंडांचा संबंध लावता येऊ शकतो, मी माझ्या सोयीसाठी ते पात्र मुस्लीम ठेवले. मुस्लीम धर्मीय लोकांना नकारात्मक पद्धतीने दाखवायचा माझा हेतू नव्हता,” असं संदीप रेड्डी वांगाने सांगितलं.