अभिनेत्री सारा अली खानची आई अमृता सिंह हिंदू आहे, तर तिचे वडील सैफ अली खान मुस्लीम आहेत. सारा तिचं पूर्ण नाव सारा अली खान असं लिहिते, तसेच मंदिरांमध्ये जाते, यावरून तिला बऱ्याचदा टीकेचा सामना करावा लागतो. आता साराने एका मुलाखतीत तिच्या कुटुंबाबद्दल विधान केलं आहे. एका धर्मनिरपेक्ष कुटुंबात जन्म झाला, त्यामुळे ज्या गोष्टी चुकीच्या आहेत, त्याविरोधात मी बोलते. पण अनावश्यक ठिकाणी बोलायला आवडत नाही, असं साराने सांगितलं. लोक तिच्या धर्मावरून टीका करतात, प्रश्न विचारतात याबद्दलही अभिनेत्रीने तिचं मत मांडलं.

‘गॅलाटा इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत सारा म्हणाली, “मी एका धर्मनिरपेक्ष कुटुंबात आणि एका सार्वभौम, धर्मनिरपेक्ष, लोकशाही असलेल्या देशात जन्मले. मला कधी अन्यायाविरोधात बोलायची गरज भासली नाही, कारण मला अनावश्यक बोलायला आवडत नाही. जे चुकीचं आहे त्याविरुद्ध उभं राहून बोलण्याची हिंमत माझ्यात आहे. त्यामुळे माझ्याबरोबर किंवा माझ्या आजूबाजूच्या कोणाशीही काही चुकीचं घडत असल्याचं मला दिसलं तर मी त्याबद्दल बोलेन.”

बिग बींबरोबरचा चित्रपट नाकारल्यावर घाबरलेले मिलिंद गुणाजी, त्यांना भेटायला गेले अन्…; म्हणाले, “माझं स्पष्टीकरण ऐकून…”

लोकांना जेव्हा तिने केलेलं काम आवडत नाही तेव्हा त्याचा त्रास होतो, पण वैयक्तिक गोष्टींबद्दल, धार्मिक श्रद्धांबद्दल तिला कोणीही काहीही म्हटलं तर फरक पडत नाही, कारण ते तिचे निर्णय आहेत, असं साराने सांगितलं. आडनाव आणि कुटुंबाबद्दल विचारलं असता सारा म्हणाली, “माझ्या धार्मिक श्रद्धा, माझ्या खाण्या-पिण्याच्या आवडी, विमानतळावर कसं जायचं, ते निर्णय माझे आहेत. त्यामुळे त्यासंदर्भात काहीही असेल तर मी कधीच माफी मागणार नाही.”

एका गाण्यामुळे रातोरात स्टार बनली मराठमोळी अभिनेत्री, सहा महिन्यात झालेला घटस्फोट; तर दुसरं लग्नही मोडलं, तिचा पहिला पती…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सारा ही अभिनेता अमृता सिंह व सैफ अली खान यांची मुलगी आहे. साराला फिरायची खूप आवड आहे, ती देशातील अनेक मंदिरांना भेटी देत असते. हे फोटो ती सोशल मीडियावरही पोस्ट करते. हा आपल्या व्यक्तिमत्त्वाचा एक भाग असल्याचं सारा म्हणते. साराच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास नुकताच तिचा ‘मर्डर मुबारक’ चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला, लवकरच ती ‘ए वतन मेरे वतन’मध्ये दिसणार आहे.