अभिनेत्री सारा अली खान आणि सैफ अली खान हे दोघेही बॉलिवूडमधील प्रसिद्ध कलाकार आहेत. दोघांनीही आपापल्या चित्रपटात जबरदस्त अभिनय कौशल्य दाखवले आहे. सैफ अली खान आणि सारा अली खानच्या चाहत्यांसाठी आता एक आनंदाची बातमी समोर आली आहे. सारा आणि सैफ एकाच प्रोजेक्टमध्ये एकत्र दिसणार आहेत. या प्रोजक्टचे नुकतेच चित्रीकरण झाले आहे. मात्र अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

हेही वाचा- “तुझं करिअर बर्बाद करेन…”; जेव्हा ऋषी कपूर यांच्यावर चिडले होते सलीम खान, धमकी देत म्हणालेले…

सारा अली खान आणि सैफच्या या चित्रपटाचे शूटिंग नुकतेच झाले आहे. याच्याशी संबंधित एक फोटोही समोर आला आहे. ज्यामध्ये सैफ अली एका कैद्याच्या भूमिकेत दिसत आहे तर सारा अली पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे. हा फोटो पाहिल्यानंतर चाहत्यांची उत्सुकता वाढत आहे. विशेष म्हणजे, सैफ आणि सारा शूटिंग करत असताना इब्राहिम देखील फिल्मसिटीच्या आसपास दिसला होता. त्यामुळे तोही या चित्रपटात दिसण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर सैफ अली खानचा आदिपुरुष हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटावरुन बराच वाद सुरु आहे. चित्रपटातील लूकसाठी सैफ अली खानला ट्रोलिंगही करण्यात आले आहे. दुसरीकडे साराबद्दल सांगायचे तर, तिचा विकी कौशलसोबत ‘जरा हटके जरा बचके’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे, ज्याला प्रेक्षकांचे प्रेम मिळत आहे. एका मध्यमवर्गीय कुटुंबाची कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे.