scorecardresearch

सतीश कौशिक यांच्या निधनानंतर श्रेयस तळपदे भावूक, पोस्ट शेअर करत म्हणाला “सतीशजी…”

Sathish Kaushik Died: अभिनेता श्रेयस तळपदे सतीश कौशिक यांच्या निधनानंतर भावूक झाला आहे.

shreyas talpade on satish kaushik death
सतीश कौशिक यांचं निधन. (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Satish Kaushik Passed Away: हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आणि अभिनेते सतीश कौशिक यांचं निधन झालं आहे. ६६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी ट्वीट करत सतीश कौशिक यांच्या निधनाची माहिती दिली. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

सिनेसृष्टीतील कलाकारांनी सतीश कौशिक यांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला आहे. बॉलिवूड कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत कौशिक यांना श्रद्धांजली दिली आहे. मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीत नाव कमावणारा अभिनेता श्रेयस तळपदे सतीश कौशिक यांच्या निधनानंतर भावूक झाला आहे. श्रेयसने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन कौशिक यांच्यासाठी खास पोस्ट लिहिली आहे.

हेही वाचा>> Video: ६६व्या वर्षीही नियमित व्यायाम करायचे सतीश कौशिक, निधनानंतर जीममधील व्हिडीओ व्हायरल

हेही वाचा>> दोन वर्षांच्या मुलाला गमावल्यानंतर सतीश कौशिक यांच्यावर कोसळलेला दु:खाचा डोंगर, ५६ व्या वर्षी पुन्हा वडील झाले अन्…

श्रेयसने सतीश कौशिक यांचा हसरा फोटो इन्स्टाग्रामवरुन शेअर केला आहे. “खूप दु:खद घटना आहे. तुमच्यासारखं कोणी नव्हतं आणि होऊही शकणार नाही. तुमच्या भूमिकांव्यतिरिक्त दयाळूपणा, साधेपणा व हसणं सगळ्यांच्या लक्षात राहील. सतिशजी, तुम्ही कायमच स्मरणात राहाल. ओम शांती”, असं श्रेयसने पोस्टमध्ये म्हटलं आहे. श्रेयसच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करत शोक व्यक्त केला आहे.

हेही वाचा>> निधनाच्या एक दिवस आधीच सतीश कौशिक खेळलेले होळी, गावी गेल्यानंतर हृदयविकाराचा झटका आला अन्…

सतीश कौशिक यांनी आजवर अनेक चित्रपटांतून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. १९८३ मध्ये ‘जाने भी दो यारो’ या चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपट सृष्टीत पदार्पण केलं. चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी त्यांनी अनेक नाटकांमध्येही काम केलं. ‘रूप की रानी’ चोरों का राजा, ‘प्रेम’, ‘हम आपके दिल में रहते है’ आणि ‘तेरे नाम’ यासारख्या चित्रपटांचे त्यांनी दिग्दर्शन केले आहे. ‘मिस्टर इंडिया’, ‘दीवाना मस्ताना’, ‘साजन चले ससुराल’सह या चित्रपटांतील त्यांनी साकारलेल्या भूमिका गाजल्या. कंगना रणौतचा ‘एमर्जन्सी’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला. या चित्रपटात त्यांनी जगजीवन राम यांची भूमिका साकारली आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-03-2023 at 11:50 IST