SatyaPrem Ki Katha Twitter Review : कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी यांचा ‘सत्यप्रेम की कथा’ चित्रपट आज (२९ जून) सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला. रिलीजच्या आदल्या दिवशी या चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग आयोजित करण्यात आले होते, ज्यामध्ये अनेक बॉलीवूड स्टार्सनी हजेरी लावली व या चित्रपटाबद्दल आपल्या प्रतिक्रिया दिल्या. यासोबतच काही लोकांनी सोशल मीडियावर यावर आपल्या प्रतिक्रियाही नोंदवल्या आहेत. अशा परिस्थितीत या चित्रपटाला ट्विटरवर कसे रिव्ह्यू मिळाले आहेत, ते जाणून घेऊयात.

बालकलाकार साईशा भोईरच्या आईच्या पोलीस कोठडीत वाढ; आणखी तक्रारी आल्याची पोलिसांची माहिती, नेमकं प्रकरण काय?

कियारा अडवाणी आणि कार्तिक आर्यनची जोडी ‘भूल भुलैया २’मध्ये दिसली होती. यामध्ये त्यांच्या जोडीला लोकांनी भरभरून प्रेम दिले होते. त्यानंतर आता ‘सत्यप्रेम की कथा’मधून ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. रोमँटिक प्रेमकथा असलेल्या या चित्रपटाची निर्मिती साजिद नाडियादवाला यांनी केली आहे. चित्रपटाला लोकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. सुनील शेट्टीनेही चित्रपटाचे कौतुक केले आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी देवेंद्र फडणवीसांची मोठी अपडेट; म्हणाले, “पुरावे विश्वासार्ह…”

सुनील शेट्टीने ‘सत्यप्रेम की कथा’ बद्दल ट्वीट केले आहे. “चित्रपटाबद्दल चांगल्या गोष्टी ऐकायला मिळत आहेत. आणखी एका यशस्वी ब्लॉकबस्टर चित्रपटासाठी अभिनंदन साजिद भाई. संपूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा,” असं सुनीलने ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, चित्रपटाबद्दल चाहत्यांनीही ट्वीट केले आहेत. त्यांचे रिव्ह्यू काय आहेत ते पाहुयात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. तर समीक्षकही चित्रपटाचं कौतुक करत आहे. यामध्ये गजराज राव व सुप्रिया पाठक कार्तिकच्या पालकांच्या भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाचं दिग्दर्शन मराठमोळ्या समीर विद्वान्सने केलं आहे.