सोहेल खान व सीमा सजदेह यांचा घटस्फोट झाला आहे. दोघांनी १९९८ मध्ये पळून जाऊन लग्न केलं होतं. २४ वर्षे संसार केल्यानंतर ते २०२२ मध्ये विभक्त झाले. त्यांना निर्वाण व योहान ही दोन मुलं आहेत. सीमाने सोहेलच्या प्रेमात पडल्यावर अवघ्या तीन महिन्यात पळून जात लग्न करण्याचा घेतलेला निर्णय, सेलिब्रिटी असलेल्या कुटुंबात लग्न केल्याने आलेली असुरक्षिततेची भावना याबाबत एका मुलाखतीत भाष्य केलं आहे.

“एस टी बस फोडून आरक्षण कसे मिळते बुवा?” ‘तो’ फोटो शेअर करत केतकी चितळेची पोस्ट; म्हणाली, “चुकून तो…”

सोहेलच्या प्रेमात पडल्यावर सुरुवातीच्या दिवसांतील आठवणी सीमाने सांगितल्या. सीमा पहिल्यांदा सोहेलला अभिनेता चंकी पांडे आणि भावना पांडे यांच्या एंगेजमेंटमध्ये भेटली होती. ती म्हणाली, “मी सोहेलला भावना आणि चंकीच्या एंगेजमेंटमध्ये भेटले होते. त्यानंतर आम्ही लग्न केले. मी फक्त २२ वर्षांचे होते आणि सोहेल व माझी फक्त तीन महिन्यांची ओळख होती. त्यानंतर मी मध्यरात्री त्याच्याबरोबर पळून गेले होते. खरं तर माझ्या आई-वडिलांना इतक्या कमी वयात माझे लग्न करायचे नव्हते, त्यांचे माझ्यासाठी इतर प्लॅन्स होते, पण मी मध्यरात्री उठून सोहेलबरोबर पळून गेले होते.”

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ सोडताना ओंकार भोजने काय म्हणाला होता? दिग्दर्शक व निर्माते म्हणाले, “तो खूप…”

सोहेलशी लग्न केल्यानंतर लाइमलाइटमध्ये आल्याने मानसिक आरोग्यावर काही परिणाम झाला का? असं विचारल्यावर सीमा म्हणाली, “माझ्या पतीच्या सभोवताली अनेक सुंदर स्त्रिया असायच्या. मी अवघी २२ वर्षांची होते. त्या वयात आपल्याला फारसं काही कळत नाही. त्यामुळे मी पण असुरक्षित होते, सुरुवातीला मला खूप दडपण जाणवलं होतं. मग मी ते सर्व लक्ष मुलांच्या जन्माकडे वळवलं.”

View this post on Instagram

A post shared by Seema Kiran Sajdeh (@seemakiransajdeh)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सीमा म्हणाली की सोहेलच्या कुटुंबात खूप सारे सेलिब्रिटी होते, अशा कुटुंबात लग्न झाल्याने ती सतत स्वतःलाच प्रश्न करत होती. सोहेल हा सलमान खान आणि अरबाज खान यांचा भाऊ असून, ज्येष्ठ लेखक सलमान खानचा मुलगा आहे. त्यावेळी अरबाजने मलायका अरोराशी लग्न केलं होतं. “मला खूप असुरक्षित वाटायचं. मी खरंच चांगली आहे का? मी पुरेशी चांगली दिसते का? असे मी स्वत: ला प्रश्न करायचे. कारण मी या सर्व प्रसिद्ध आणि चांगल्या दिसणाऱ्या लोकांमध्ये होते. हा आयुष्यात धडपडण्याचा काळ होता, तो काळ सुरुवातीला कठीण होता, पण कालांतराने मात्र त्या अनुभवामुळे मला खूप चांगलं वाटायचं,” असं सीमा म्हणाली.