अफेअर, लग्न, घटस्फोटाच्या चर्चा बी-टाऊनला काही नव्या नाहीत. पण या सगळ्यामध्ये कलाक्षेत्रामधील काही जोडप्यांकडे आदर्श कपल म्हणून पाहिलं जातं. त्यातीलच एक जोडपं म्हणजे जावेद अख्तर आणि शबाना आझमी. शबाना व जावेद सुखाचा संसार करत आहेत. पण लग्न करणं या दोघांसाठी अगदी कठीण होतं. याचबाबत शबाना यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये भाष्य केलं आहे.

१९८४मध्ये शबाना व जावेद विवाहबंधनात अडकले. पण जावेद यांचं हे दुसरं लग्न होतं. जावेद यांच्या पहिल्या पत्नी हनी इराणी होत्या. जावेद विवाहित असतानाच ते शबाना यांच्या प्रेमात पडले. शिवाय पहिल्या पत्नीपासून त्यांना दोन मुलंही होती. हनी यांना घटस्फोट न देताच शबाना यांच्याशी जावेद यांनी दुसरं लग्न केलं. शबाना यांच्याशी लग्न केल्यानंतर वर्षभरामध्ये इराणी व जावेद यांचा घटस्फोट झाला.

आणखी वाचा – “मेकअप करणाऱ्याला…” लूकवरुन ट्रोल करणाऱ्यावर भडकली ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परब, म्हणाली, “काळजी करु नको कारण…”

पण जावेद यांच्याशी लग्न करणं शबाना यांच्यासाठी काही सोपं नव्हतं. नुकतंच ‘कर्ली टेल्स’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये शबानी यांनी त्यांच्या वैवाहिक आयुष्याबाबत भाष्य केलं आहे. त्या म्हणाल्या, “तो काळ खूपच कठीण होता. आम्ही तिघं (जावेद यांच्या पहिल्या पत्नीसह) त्यावेळी कोणत्या प्रसंगामधून जात होतो हे कोणच समजू शकत नाही. प्रेम होतं म्हणून लग्न केलं हे सगळं एवढं सोपं नव्हतं. कारण या सगळ्यामध्ये मुलांचाही समावेश होता”.

आणखी वाचा – विलेपार्लेच्या चाळीत राहणाऱ्या ‘चला हवा येऊ द्या’मधील प्रसिद्ध अभिनेत्रीच्या भावाने २२व्या वर्षी खरेदी केली दुचाकी, म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे त्या म्हणाल्या, “जावेद यांना आधीच दोन मुलं होती. मुलांमुळे आम्ही एकमेकांपासून तीन वेळा विभक्त होण्याचाही निर्णय घेतला. पण आम्ही एकमेकांपासून दूर राहणं शक्य झालं नाही. आज माझं सगळ्यांबरोबरच चांगलं नातं आहे ही समाधानकारक गोष्ट आहे. हनी (जावेद यांची पहिली पत्नी) आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य आहे. जोया व फरहान (जावेद यांची मुलं) यांच्याबरोबर माझं मैत्रीपूर्ण नातं आहे. आमचं आमच्या मुलांबरोबर चांगलं नातं आहे. आमच्या नात्याला शेवटी अगदी चांगलं वळण मिळालं”. शबाना यांना त्यांच्या जुन्या दिवसांची यानिमित्ताने पुन्हा एकदा आठवण झाली.