देशभरात आज मोठ्या उत्साहात, आनंदात धुळवड साजरी केली जात आहे. सर्वजण धुळवडीच्या रंगात रंगून गेले आहेत. ‘बुरा ना मानो होली है’ असं म्हणत सर्वजण एकमेकांना रंग लावत आहेत. कलाकार मंडळीही धुळवड साजरी करताना दिसत आहेत. सोशल मीडियावर फोटो, व्हिडीओ शेअर करून चाहत्यांना धुळवडीच्या शुभेच्छा देत आहेत. अशात बॉलीवूडचा किंग खान व पत्नी गौरी खानचा जुना होळीचा व्हिडीओ व्हायरल होतं आहे.

‘इंस्टंट बॉलीवूड’ या इन्स्टाग्राम पेजवर शाहरुख खान व गौरी खानचा होळी सेलिब्रेशनचा जुना व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत, शाहरुख गौरीला पाण्याच्या टाकीत बसवून तिला भिजवताना दिसत आहे. एवढंच नाहीतर दोघं बेभान नाचताना पाहायला मिळत आहे. होळीनिमित्ताने शाहरुख व गौरीचा हा जुना व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे.

सुभाष घईंच्या होळी पार्टीमधला आहे शाहरुख व गौरीचा ‘हा’ व्हिडीओ

१९९६साली सुभाष घई यांनी मड आयलँडमधील त्यांच्या मेघना कॉटेजमध्ये होळी पार्टी आयोजित केली होती. या पार्टीला शाहरुख खानसह बॉलीवूडचे अनेक सेलिब्रिटी उपस्थितीत राहिले होते. या होळी पार्टीचा व्हिडीओ सुभाष घई यांनी २०२१मध्ये त्यांच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला होता.

View this post on Instagram

A post shared by SG (@subhashghai1)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, शाहरुख खान व गौरी खानचं लव्ह मॅरेज आहे, हे सर्वश्रुत आहे. २५ ऑक्टोबर १९९१ साली दोघांनी लग्न केलं होतं. त्याआधी १९९२ साली किंग खानने ‘दीवाना’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं.