Anant Ambani And Radhika Merchant Pre Wedding Celebration : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग सोहळ्याला १ मार्चपासून जामनगरमध्ये सुरुवात झाली आहे. या कार्यक्रमाला मनोरंजन विश्वापासून ते राजकीय, क्रिकेट अशा सगळ्या क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली आहे. अंबानी कुटुंबीयांनी उपस्थित पाहुण्यांसाठी जामनगरमध्ये जय्यत तयारी केल्याचं पाहायला मिळत आहे.

प्री-वेडिंगच्या पहिल्याच दिवशी ( १ मार्च ) हॉलीवूड गायिका रिहानाने जबरदस्त परफॉर्मन्स दिला होता. यानंतर दुसऱ्या दिवशी बॉलीवूड सेलिब्रिटी व्यासपीठावर एकत्र थिरकताना पाहायला मिळाले. रणवीर-दीपिका, शाहरुख-सलमान व आमिर, रणबीर-आलिया, जान्हवी-सारा, करीना व करिश्मा कपूर या सगळ्या सेलिब्रिटींनी मोठ्या उत्साहात या प्री-वेडिंग सोहळ्यात परफॉर्म केलं. या सगळ्यांचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशातच एका खास व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

a man flying a kite while standing at the train gate video goes viral on social media
धक्कादायक! चक्क ट्रेनच्या दरवाजावर उभा राहून तरुण उठवतोय पंतग; VIDEO व्हायरल
ravi jadhav wife scuba diving on gulabi sadi
Video : ‘गुलाबी साडी’ गाण्यावर खोल समुद्रात डान्स! स्कूबा डायव्हिंग करताना रवी जाधव यांच्या पत्नीचा हटके अंदाज
a lady cherishes motherhood with passion
VIDEO : बाळ कडेवर घेऊन वाजवतेय ढोल ताशा! आवडीबरोबर मातृत्व जपणाऱ्या आईचा व्हिडीओ व्हायरल
Bigg boss Fame 17 ayesha khan gulabi sadi video viral
“तू माझा जीव घेतलास”, ‘बिग बॉस’ फेम आयशा खानच्या ‘गुलाबी साडी’ गाण्यावरील व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या कमेंट्सचा पाऊस, म्हणाले…

हेही वाचा : Video : सासूबाईंसह डान्स, बाबांनी लावली लेकीला हळद अन्…; ‘असा’ पार पडला पूजा सावंतचा हळदी सोहळा

शाहरुख आणि सुहाना खान यांनी प्री-वेडिंग कार्यक्रमात एकत्र डान्स केल्याचा व्हिडीओ इन्स्टंट बॉलीवूड या पापाराझी पेजवरून शेअर करण्यात आला आहे. यावेळी सुहानाबरोबर बिग बींची नात नव्या नवेली नंदा, अनन्या पांडे, शनाया कपूर या देखील उपस्थित होत्या. हे सगळेजण मिळून दिलजीत दोसांझच्या लव्हर गाण्यावर थिरकले. प्री-वेडिंग कार्यक्रमात दिलजीतने लाइव्ह परफॉर्म केलं होतं.

हेही वाचा : ‘जीव माझा गुंतला’ फेम मल्हार-अंतरा झाले खऱ्या आयुष्यात हमसफर, लग्नाचा फोटो शेअर करत योगिता चव्हाणने दिला सुखद धक्का

दरम्यान, अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंग कार्यक्रमाचा आज ( ३ मार्च ) शेवटचा दिवस आहे. येत्या जुलै महिन्यात हे दोघंही लग्नबंधनात अडकणार आहेत.