पूजा सावंत आणि सिद्धेश चव्हाण यांचा विवाहसोहळा २८ फेब्रुवारीला थाटामाटात पार पडला. या दोघांच्या लग्नाला सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी उपस्थिती लावली होती. गेल्या महिन्याभरापासून पूजाच्या लग्नाची कलाविश्वात चर्चा चालू होती. साखरपुडा, संगीत, मेहंदी, हळद, ग्रहमख असे सगळे विधी पूजा-सिद्धेशच्या लग्नात मोठ्या उत्साहाने करण्यात आले. अभिनेत्रीने सोशल मीडियावर नुकताच तिच्या हळदी सोहळ्यातील खास व्हिडीओ शेअर केला आहे.

पूजा आणि सिद्धेशच्या हळदी समारंभासाठी पाहुण्यांसाठी खास पिवळ्या रंगाची थीम ठेवण्यात आली होती. पण, ‘सिद्धजा’ने यावेळी जांभळ्या रंगाचे कपडे परिधान केले होते. पांढऱ्या रंगाच्या फुलांचे दागिने, सिद्धेशची नवरी असं नाव लिहिलेला टॅग, जांभळ्या रंगाचा लेहेंगा असा खास लूक पूजाने केला होता.

boney kapoor
वडिलांच्या १० नोकऱ्या गेल्या, मुंबईत आले अन् राज कपूर यांच्या घरात नोकराच्या…; बोनी कपूर यांनी सांगितला कुटुंबाचा संघर्ष
shalini patil vishal patil
शालिनी पाटलांनी नातू विशाल पाटलांचे कान टोचले, अपक्ष लढण्याच्या चर्चेवर म्हणाल्या, “घरातल्या कार्यालयात बसून…”
nagpur crime news, suspicion of character nagpur
प्रेमविवाहानंतर पत्नीच्या चारित्र्यावर संशय; पतीने पत्नीला पाजले विष, पोलिसांनी…
bjp keshav upadhyay article targeting sharad pawar uddhav thackeray and praskash ambedkar
संगीत खंजीर कल्लोळ…

हेही वाचा : दाक्षिणात्य सुपस्टार अन् प्रवीण तरडेंची जोडी जमणार! पुण्यात प्रदर्शित होणार पहिलं पोस्टर, चित्रपटात दिग्गजांची मांदियाळी

पूजा-सिद्धेशच्या हळदी सोहळ्यात ‘लडकीवाले’ आणि ‘लडकेवाले’ अशा दोन टीम्स करण्यात आल्या होत्या. क्रिकेट सामन्यात सिद्धेशच्या टीमने, तर हळदी समारंभात पूजाच्या टीमने बाजी मारली. यावेळी अभिनेत्रीने तिची आई, सासूबाई आणि नवऱ्यासह जबरदस्त डान्स केला. पूजाचे बाबा लाडक्या लेकीला हळद लावत असल्याचा सुंदर क्षण या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : “प्रिय झी मराठी…”, कुशल बद्रिकेचं भावुक पत्र! ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमाबद्दल म्हणाला, “रात्रीच्या अंधारात…”

दरम्यान, पूजा सावंत आणि सिद्धेश चव्हाण यांच्या हळदी सोहळ्याला प्रार्थना बेहेरे व अभिषेक जावकर, शाल्मली टोळ्ये, भूषण प्रधान, सुखदा खांडकेकर, गौरी महाजनी यांसह अनेक कलाकारांनी उपस्थिती लावली होती.