बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा आज ५७वा वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याची बहीण अर्पिता खान आणि आयुष शर्मा यांनी मोठी पार्टी आयोजित केली होती. ही पार्टी अर्पिता खानच्या मुंबईतील घरी झाली आणि पार्टीमध्ये अनेक सेलिब्रिटींसह, अभिनेता शाहरुख खाननेही हजेरी लावली. सलमान-शाहरुखच्या भेटीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

सलमानने माध्यमांबरोबर वाढदिवसाचा केक कापला. त्याच्या चाहत्यांनीही बाहेर गर्दी केली होती. सलमानच्या बर्थडे पार्टीला शाहरुख काळ्या रंगाच्या स्मार्ट कॅज्युअलमध्ये पोहोचला होता. पार्टी झाल्यानंतर सलमान किंग खानला बाहेर सोडण्यासाठी आला. यावेळी दोघांनी एकमेकांना मिठी मारत भेट घेतली आणि पोजही दिल्या.

एकेकाळी एकमेकांचं तोंडही न पाहणाऱ्या बॉलिवूडच्या या दिग्गजांनी काही वर्षांपूर्वी त्यांच्यातील सर्व वाद संपवले. आता ते एकमेकांचे चांगले मित्र झाले आहेत. आज सलमानच्या वाढदिवसाला शाहरुखने हजेरी लावली. हे पाहून चाहत्यांनीही कौतुक केलंय. ‘एकाच फ्रेममध्ये दोन किंग’, ‘दोघांनाही पुन्हा एकदा स्क्रीनवर एकत्र पाहता येईल का’, ‘भाईजान आणि किंग खान बेस्ट आहेत’, ‘लिजेंड्स’, ‘डॉन’ आणि ‘दबंग’ एकत्र, अशा प्रकारच्या कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. अनेक चाहत्यांनी रेड हार्ट इमोजी टाकले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, सलमानच्या वाढदिवसाच्या पार्टीला सोनाक्षी सिन्हा, संगीता बिजलानी, सलमानचे भाऊ अरबाज व सोहेल यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली.