Shah Rukh Khan dances with Rani Mukerji: अभिनेता शाहरुख खान व अभिनेत्री राणी मुखर्जी हे बॉलीवूडचे लोकप्रिय कलाकार आहेत. या दोन्ही कलाकारांनी अनेक चित्रपटांत एकत्र काम केले आहे. वीरा-झारा, चलते चलते, कभी अलविदा ना कहना, कुछ कुछ होता है अशा अनेक सिनेमांतून त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली.
आता शाहरुख व राणी पुन्हा एकदा एकत्र दिसले. शाहरुख खानचा मुलगा लवकरच बॅड्स ऑफ बॉलीवूड या सीरीजमधून मनोरंजन सृष्टीत पदार्पण करणार आहे. विशेष म्हणजे तो अभिनयातून आणि तर दिग्दर्शनाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
आता सीरीजच्या तू पहली तू आखरी या टायटल ट्रॅकवर शाहरुख खानने रील शेअर केली आहे. या रीलमध्ये त्याच्याबरोबर अभिनेत्री राणी मुखर्जी आहे, त्यामुळे ही रील लक्ष वेधून घेत आहे. सोशल मीडियावर राणी व शाहरुख खानचा हा व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे.
या व्हि़डीओमध्ये शाहरुखने जीन्स आणि निळ्या रंगाचा स्वेटशर्ट घातलेला दिसत आहे. तर राणीने पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि निळ्या डेनिम जीन्स घातली आहे. या व्हिडीओमध्ये ते रोमँटिक गाण्यावर काही डान्स स्टेप्स करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ शेअर करताना शाहरुख खानने लिहिले, “राष्ट्रीय पुरस्कार, आपल्या दोघांची अपूर्ण इच्छा पूर्ण झाली. अभिनंदन राणी, तू एक राणी आहेस आणि मी कायमच तुझ्यावर प्रेम करतो.” सध्या तू पहली तू अखरी हे गाणे ट्रेंड होत असल्याचे दिसत आहे.
नेटकरी काय म्हणाले?
अभिनेत्याने शेअर केलेल्या या व्हिडीओवर चाहते कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. अनेकांनी राहुल व टीना असे लिहीले आहे. “सुंदर जोडी”, “क्यूट जोडी”, “किंग खान”, “२०००च्या दशकातील माझे आवडते जोडपे”, “तुम्हाला पुन्हा मोठ्या पडद्यावर एकत्र पाहण्याची आमची इच्छा आहे”, “तुम्हा दोघांना एकत्र बघण्याची इच्छा पूर्ण झाली”, “राहुल व टीना समांतर विश्वात”, अशा अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहे.




काही दिवसांपूर्वीच ७१ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये शाहरुख खानला सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि राणी मुखर्जीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. अॅटलीच्या जवान चित्रपटातील भूमिकेसाठी शाहरुख खानला त्याचा पहिला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला, तर राणी मुखर्जीला मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वेमधील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.
कामाच्या बाबतीत, शाहरुख खान आणि राणी मुखर्जी लवकरच सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित आगामी अॅक्शन-थ्रिलर चित्रपट ‘किंग’ मध्ये पुन्हा एकत्र येणार असल्याचे म्हटले जात आहे. या चित्रपटात शाहरुख खानची मुलगी सुहाना खान, अभिषेक बच्चनदेखील प्रमुख भूमिकांत दिसणार आहेत.