Shah Rukh Khan Emotional On Swades Act : बॉलीवूडमधल्या बहुतांश सेलिब्रिटींची मुलं ‘धीरुभाई अंबानी स्कूल’मध्ये आपलं शालेय शिक्षण पूर्ण करत आहेत. नुकताच या शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा पार पडला. यावेळी शाहरुख-गौरी, करीना कपूर-सैफ अली खान, शाहिद-मीरा, रितेश-जिनिलीया, करिश्मा कपूर, करण जोहर, क्रिकेटर रोहित शर्माची पत्नी रितिका, ऐश्वर्या राय-अभिषेक बच्चन असे अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. या सगळ्यांनी आपल्या मुलांचे परफॉर्मन्स एन्जॉय केल्याचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
शाहरुख खानचा ( Shah Rukh Khan ) मुलगा अबराम आणि ऐश्वर्या-अभिषेकची लेक आराध्या बच्चन यांनी एकत्र या सोहळ्यात बालनाट्य सादर केलं. ‘ख्रिसमस’वर आधारित त्यांनी सुंदर असं बालनाट्य नाट्य सादर करत सर्वांचं मन जिंकून घेतलं. यावेळी शाहरुख आणि ऐश्वर्या आपल्या मुलांचा परफॉर्मन्स मोबाइलवर शूट करताना दिसले. या सोहळ्यातील आणखी एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.
शाहरुख खानचा व्हिडीओ व्हायरल
धीरुभाई अंबानी शाळेच्या काही विद्यार्थ्यांनी शाहरुख खानच्या २० वर्षांआधी प्रदर्शित झालेल्या ‘स्वदेस’ चित्रपटातील “ये जो देस हैं मेरा, स्वदेस हैं मेरा” या गाण्यावर सादरीकरण केलं. हा देशभक्तीपर चित्रपट २००४ मध्ये प्रदर्शित झाला होता. शाळेतील मुलं परफॉर्मन्स सादर करताना किंग खान सुद्धा हे गाणं गुणगुणत होता. यादरम्यान, शाहरुख काहीसा भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. अभिनेत्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यावेळी शाहरुखची पत्नी गौरी खान व लेक सुहाना या दोघी सुद्धा उपस्थित होत्या.
याशिवाय कार्यक्रमाच्या शेवटी शाहरुख खान ( Shah Rukh Khan ) शाळेतील विद्यार्थ्यांबरोबर ‘दिवांगी दिवांगी’ या ‘ओम शांती ओम’ चित्रपटातील गाण्यावर सुद्धा थिरकल्याचं पाहायला मिळालं.
हेही वाचा : तैमूरला डान्स करताना पाहून भलतीच खूश झाली करीना कपूर! लेकाचा व्हिडीओ काढला अन् मध्येच उठून…; पाहा व्हिडीओ
SRK became emotional when the students were performing on Swades' song "Yeh Jo Desh Hai Tera". @iamsrk pic.twitter.com/lZMT3YVWcO
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.— Nidhi (@SrkianNidhiii) December 19, 2024
दरम्यान, शाहरुख खानच्या ( Shah Rukh Khan ) आगामी कामाबद्दल सांगायचं झालं, तर अभिनेता सुजॉय घोषच्या बहुप्रतिक्षित ‘किंग’ चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात शाहरुख आणि सुहाना पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत. त्यामुळे किंग खानचे चाहते आतुरतेने या चित्रपटाची वाट पाहत आहेत.