scorecardresearch

प्रदर्शनाच्या एक दिवस आधीच ‘पठाण’ झाला लीक! यशराज फिल्म्स ट्वीट करत म्हणाले…

Pathaan: पठाण लीक झाल्यामुळे शाहरुख खानच्या चिंतेत भर, ‘यशराज फिल्म्स’ ट्वीट करत म्हणाले…

प्रदर्शनाच्या एक दिवस आधीच ‘पठाण’ झाला लीक! यशराज फिल्म्स ट्वीट करत म्हणाले…
शाहरुख खानचा 'पठाण' चित्रपट लीक. (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा बहुचर्चित ‘पठाण’ आज बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला. बॉयकॉट ट्रेण्डमध्ये अडकलेल्या या चित्रपटाने अडव्हान्स बुकिंगमधून तब्बल २४ कोटींची कमाई केली आहे. चार वर्षांच्या ब्रेकनंतर शाहरुख पुन्हा चित्रपटातून भेटीला आल्याने चाहतेही उत्सुक आहेत. परंतु, शाहरुखचा ‘पठाण’ लीक झाल्याची माहिती आहे.

प्रदर्शनाच्या एक दिवस आधीच ‘पठाण’ चित्रपट ऑनलाईन लीक झाला आहे. ‘टाइम्स नाऊ’ने दिलेल्या वृत्तानुसार, ‘पठाण’ चित्रपट Filmyzilla आणि Filmy4wap या वेबसाईटवर लीक करण्यात आला आहे. ‘पठाण’ ऑनलाईन लीक होण्याबाबत चित्रपटाची निर्माती कंपनीला शंका होती. त्यामुळे त्यासंदर्भात सगळी खबरदारी घेण्यात आली होती. परंतु, असं असूनही ‘पठाण’ चित्रपट लीक करण्यात आला आहे.

‘पठाण’ चित्रपट निर्मित केलेल्या यशराज फिल्म्सने याबाबत एक ट्वीट केलं आहे. “तुम्ही सगळ्यात मोठ्या धमाकेदार अक्शन चित्रपटासाठी तयार आहात? कृपया चित्रपट पाहताना व्हिडीओ शूट करुन ते ऑनलाईन व्हायरल करू नका. ‘पठाण’चा आनंद चित्रपटगृहांतच जाऊन घ्या”, असं ट्वीटमध्ये म्हटलं गेलं आहे. शाहरुख खाननेही याबाबत त्याच्या सोशल मीडियावरुन पोस्ट शेअर करत पठाण चित्रपटगृहात जाऊन बघण्याचं आवाहन प्रेक्षकांना केलं आहे.

बहुप्रतीक्षीत ‘पठाण’ चित्रपट बेशरम रंग गाण्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. या गाण्यात दीपिका पदुकोणने भगवी बिकिनी परिधान करत रोमान्स केल्यामुळे गाण्यावर आक्षेप घेण्यात आला होता.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-01-2023 at 10:57 IST

संबंधित बातम्या