बॉलिवूडचा किंग शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली होती. आता लवकरच ‘जवान’ या चित्रपटाच्या माध्यमातून शाहरुख मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शाहरुख सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो नुकतीच शाहरुखला चित्रपटसृष्टीत ३१ वर्ष पूर्ण झाली. या निमित्त अभिनेत्याने ‘आस्क एसआरके’ (#AskSRK)सेशन घेतले होते. या वेळी शाहरुखला त्याच्या चाहत्यांनी काही प्रश्न विचारले. या सर्व प्रश्नांना शाहरुखने भन्नाट उत्तरे दिली आहेत.

हेही वाचा- अर्जुन कपूरच्या वाढदिवसाच्या पार्टीत मलायकाच्या डान्सची चर्चा; ‘तो’ व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले “तुझा मुलगा…”

AskSRK सत्रादरम्यान, श्रेयस आर्यन नावाच्या यूजरने शाहरुख खानला विचारले, “केकेआरचं लहान बाळ रिंकू सिंगसाठी काय बोलालं.” चाहत्याच्या या प्रश्नाला शाहरुख खानने दिलेल्या प्रतिक्रियेवरुन सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. शाहरुख म्हणला “रिंकू बाप आहे, लहान बाळ नाही.”. शाहरुखच्या या उत्तराने सगळीकडे चर्चांना उधाण आले आहे.

हेही वाचा- ‘प्रोजेक्ट के’साठी प्रभास, बिग बी, कमल हासन यांनी आकारले कोट्यावधींचे मानधन; आकडा वाचून बसेल धक्का

शाहरुख खानच्या या ट्विटवर चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. अवघ्या काही तासांतच या ट्वीटवर ६०० हून अधिक लोकांनी कमेंट केल्या आहेत. तर १७ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

रिंकू सिंह शाहरुख खानच्या टीम KKR चा महत्त्वाचा सदस्य आहे. तो अनेक वर्षांपासून संघाशी जोडला गेला आहे. गेल्या आयपीएल सीझनमध्ये त्याने सामन्यातील शेवटच्या पाच चेंडूत पाच षटकार मारून संघाला विजय मिळवून दिला होता आपल्या ऐतिहासिक खेळीने सर्वांची मने जिंकली. याशिवाय रिंकूने अनेक शानदार खेळी खेळल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शाहरुखच्या वर्कफ्रंटबाबत बोलायच झालं तर, शाहरुखचा पठाण चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई केली होती. सध्या शाहरुख ‘जवान’ चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. हा चित्रपट या वर्षी जूनमध्ये प्रदर्शित होणार होता. मात्र आता या चित्रपटाचे प्रदर्शन सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आले आहे. हा चित्रपट ७ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. ‘जवान’मध्ये शाहरुख खानबरोबर नयनतारा आणि विजय सेतुपती देखील दिसणार आहे.