Anant Ambani And Radhika Merchant : अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंगची सध्या जोरदार चर्चा चालू आहे. अंबानी कुटुंबीयांनी गुजरातमधील जामनगरमध्ये या भव्य सोहळ्याचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमाला संपूर्ण बॉलीवूड कलाविश्व एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. सध्या या प्री-वेडिंग कार्यक्रमाचे व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहेत.

अंबानी कुटुंबीयांनी ६ मार्चला संध्याकाळी जामनगरमध्ये रिलायन्स समुहाच्या कर्मचाऱ्यांना एक खास पार्टी दिली. या पार्टीसाठी शाहरुख खान, सलमान खान, जान्हवी कपूर, रणवीर सिंह यांसारखे बरेच बॉलीवूड सेलिब्रिटी पुन्हा एकदा जामनगरमध्ये दाखल झाले होते. यावेळी या कलाकारांनी बॉलीवूडच्या लोकप्रिय गाण्यांवर डान्स केला. याशिवाय या पार्टीतील एक व्हिडीओ सर्वांचं विशेष लक्ष वेधून घेत आहे. यामध्ये शाहरुख खान सर्वांशी गुजरातीमध्ये संवाद साधत असल्याचं पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : अंबानींचं प्री-वेडिंग संपता संपेना…; शाहरुख, सलमानसह रणवीर सिंह पुन्हा पोहोचले जामनगरला, व्हिडीओ व्हायरल

शाहरुख खानचं अंबानी कुटुंबीयांनी घरच्या सदस्याप्रमाणे स्वागत केलं. जामनगरच्या प्रेक्षकांना इम्प्रेस करण्यासाठी किंग खानने खास गुजराती भाषेत संवाद साधला. त्याने त्याच्या लोकप्रिय चित्रपटातील डॉयलॉग गुजरातीमध्ये रिक्रिएट केले. याशिवाय ‘जामनगर तबीयत एकदम तबलातोड़ छे’ असा डॉयलॉग मारत शाहरुखने सगळ्या प्रेक्षकांना अभिवादन केलं.

हेही वाचा : तारीख अन् वेळ ठरली! ‘झी मराठी’वर सुरू होणार दोन नव्या मालिका, प्रोमो आले समोर…

शाहरुख खान गुजरातीमध्ये संवाद साधत असल्याचं पाहून प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला. अभिनेत्याचं गुजराती ऐकून अनेकजण थक्क झाल्याचं यावेळी पाहायला मिळालं. सध्या किंग खानचा हा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अंबानी कुटुंबीयांनी जामनगरमध्ये या सगळ्या बॉलीवूड कलाकारांचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं होतं. या सगळ्यांसाठी आधुनिक सुखसुविधांनी परिपूर्ण असे आलिशान तंबू उभारण्यात आले होते.