बॉलिवूडचा किंग खान अशी ओळख असलेला अभिनेता शाहरुख खानचा ‘स्वदेस’ चित्रपट आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. याच चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री गायत्री जोशी कार अपघात झाला आहे. या रस्ते अपघातात गायत्री आणि तिचा पती विकास ओबेरॉय दोघेही जखमी झाले. तर दुसऱ्या गाडीमध्ये असलेल्या एका स्विस जोडप्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा भीषण अपघात इटलीच्या सार्डिनिया भागात घडला. यावेळी गायत्री जोशी तिचा पती विकास ओबेरॉयसह निळ्या रंगाच्या लॅम्बोर्गिनी कारमधून प्रवास करत होती. यावेळी त्यांच्या आजूबाजूला काही आलिशान गाड्याही दिसत आहेत. यादरम्यान एका गाडीने मिनी ट्रकला ओव्हरटेक करतेवेळी त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. त्यामुळे पुढे असलेला मिनी ट्रक हवेत उडाला आणि तो ट्रक पलटी झाला. त्यापुढे असलेल्या फेरारी कारलाही आग लागली. त्यामुळे त्या कारमध्ये बसलेल्या स्विस जोडप्याचा जागीच मृत्यू झाला.
आणखी वाचा : “कुशल बद्रिकेचे पुढचे दोन दात खोटे…” प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक खुलासा करत म्हणाला, “रुमाल रक्ताने…”

या अपघातात मृत्यू झालेले जोडपं हे स्वित्झरलँडला राहणारे आहे. मेलिसा क्रौटली(६३) आणि मार्कस क्रौटली(६७) असे या मृत्यू झालेल्या पती-पत्नीचे नाव आहे. या अपघातात गायत्री आणि विकास ओबेरॉय यांना दुखापत झाल्याचे बोललं जात आहे. स्थानिक वृत्तावाहिनीशी बोलताना गायत्री जोशी म्हणाली, विकास आणि मी इटलीमध्ये आहोत. इथे आमचा अपघात झाला, पण देवाच्या कृपेने आम्ही पूर्णपणे ठीक आहोत.

आणखी वाचा : “आम्ही एक वडापाव…”, प्रसिद्ध मराठी दिग्दर्शकाने सांगितल्या संघर्ष काळातील आठवणी, म्हणाले “दुधासाठी पैसे…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान गायत्री जोशीने २००४ मध्ये ‘स्वदेस’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात शाहरुख खानबरोबर मुख्य अभिनेत्री म्हणून झळकली. पण या चित्रपटानंतर तिने अभिनय क्षेत्रातून काढता पाय घेतला. यानंतर काही वर्षांनी तिने ओबेरॉय कन्स्ट्रक्शनचे व्यवस्थापकीय संचालक विकास ओबेरॉय यांच्याशी लग्न केले.