बॉलीवूड अभिनेता शाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांच्या लग्नाचा आज ८ वा वाढदिवस आहे. या दिवसानिमित्त शाहिदने इन्स्टाग्रामवर एक खास पोस्ट शेअर केली आहे. मीराबरोबरचा एक फोटो शेअर करत शाहिदने लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र, या शुभेच्छांपेक्षा शाहिदने पोस्टसाठी दिलेल्या कॅप्शनने सगळ्यांच लक्ष वेधलं आहे.

मीरानेही एक सुंदर फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत शाहिदला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या फोटोत दोघे एकमेकांना मिठी मारताना दिसत आहेत. चित्रात मीरा शाहिदचे चुंबन घेत आहे हा फोटो शेअर करत मीराने लिहिले. ‘Happy 8 baby..’ दोघांच्या या फोटोवर चाहत्यांनी कमेंट करत शुभेच्छा दिल्या आहेत.

शाहिदने ७ जुलै २०१५ रोजी पंजाबी रितीरिवाजांनुसार स्वतःपेक्षा १३ वर्षांनी लहान असलेल्या मीराशी लग्न केले होते. त्यावेळी मीरा फक्त २१ वर्षांची होती. या जोडप्याच्या पहिल्या भेटीची कहाणीही खूप रंजक आहे. खरे तर दोघेही जेव्हा पहिल्यांदा भेटले होते, त्यावेळी शाहिद ‘उडता पंजाब’चे शूटिंग करत होता आणि त्याने दाढी आणि केस दोन्ही वाढवले ​​होते. नुकताच तो मीराला भेटायला आला होता आणि त्याला असे पाहून मीराला धक्का बसला होता.