Shahid Kapoor’s daughter Misha: अभिनेता शाहिद कपूरची बॉलीवूडमध्ये एक वेगळी ओळख आहे. ‘विवाह’पासून ‘जब वी मेट’ ते ‘कबीर सिंग’ असे त्याचे अनेक चित्रपट गाजले. अभिनेता अनेकदा त्याच्या मुलांमुळे, पत्नी मीरामुळेदेखील चर्चेत असतो.
शाहिद कपूर व त्याची पत्नी मीरा हे अनेकदा सार्वजनिक ठिकाणी दिसतात. मात्र, त्यांची मुले फारशी सार्वजनिक ठिकाणी दिसत नाहीत. आता अभिनेत्याच्या मुलीचा एक फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. खूप दिवसांनंतर मिशाचा फोटो पाहायला मिळत आहे.
शाहिद कपूरच्या ९ वर्षांच्या मुलीला पाहिलंत का?
आज २६ ऑगस्ट २०२५ ला मिशा तिचा ९ वा वाढदिवस साजरा करत आहे. या निमित्ताने आई मीरा राजपूतने एक हृदयस्पर्शी पोस्ट शेअर केली आहे. तिने लेकीला खास शब्दात वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. याबरोबरच तिने फोटोदेखील शेअर केले आहेत.
मीराने शेअर केल्या एका फोटोमध्ये मिशा एका लाकडावर बसलेली दिसत आहे. पायात बूट, निळ्या रंगाची जिन्स, गडद निळ्या रंगाचा शर्ट, मोकळे केस असा तिचा लूक पाहायला मिळत आहे. या फोटोमध्ये मिशा गोड हसताना दिसत आहे. हा फोटो शेअर करत मीराने तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. माझी लहान मुलगी आता मोठी झाली आहे, असेही तिने या पोस्टमध्ये लिहिले.
चाहत्यांनी मीराच्या या पोस्टवर तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा अशा कमेंट केल्या आहेत, तर काहींनी हार्ट इमोजी शेअर करत प्रेम व्यक्त केले आहे. नेहा धुपिया, अनन्या पांडे यांनीदेखील मिशाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
गेल्या काही वर्षांत मीराने अनेकदा तिच्या मुलांबरोबरचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करताना त्यांचे चेहरे दिसू नयेत याची काळजी घेतल्याचे वेळोवेळी पाहायला मिळाले. २०१८ मध्ये तिने पापाराझींना मुलांचे फोटो न काढण्याची विनंती केली होती. त्यांना त्यांचे बालपण जगू द्या, असे ती म्हणाली होती.
शाहिद कपूरच्या कामाबद्दल बोलायचे तर तो ‘फर्जी २’, ‘कॉकटेल २’ या चित्रपटांतून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.